२६ रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित

By Admin | Published: November 27, 2015 11:54 PM2015-11-27T23:54:20+5:302015-11-27T23:55:11+5:30

भोजापूर धरण : शेतकऱ्यांचा विरोध न जुमानता धडक कारवाई

26 power supply breaks | २६ रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित

२६ रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित

googlenewsNext

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणातील अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी पाटबंधारे, महसूल, वीज वितरण व पोलीस यांच्या संयुक्त पथकाने धडक मोहीम राबवत वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली. धरण क्षेत्रातील सुमारे २६ वीज रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. दहा वीज रोहित्रांचे गाळे उतरविण्यात आले आहे. दापूरसह काही भागातील शेतकऱ्यांनी यास विरोध केला. मात्र पथकाने विरोध मोडीत काढीत कारवाई केली.
भोजापूर धरणात केवळ
४० टक्क्यांच्या आसपास पाणी शिल्लक राहिले आहे. या धरणातील मनेगावसह १६ गाव पाणीपुरवठा योजना, कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. यावर्षी धरण न भरल्याने रब्बीसाठी आवर्तन सुटेल की नाही याची शाश्वती नसताना धरणातून अवैध पाणी उपसा केला जात होता. याची गंभीर दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली होती.
धरणातील पाणी योजनांसाठी आगामी पावसाळ्यापर्यंत शिल्लक राहावे यासाठी अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी शुक्रवारी धरणक्षेत्रात संयुक्त मोहीम राबविण्यात आली होती. त्यांनी भोजापूर प्रकल्पाच्या जलाशया सभोवतालचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई केली.
दापूर : चापडगाव, चास, कासारवाडी व सोनेवाडी शिवारात सदर कारवाई करण्यात आली. या भागातील २६ रोहित्रांचे वीज कनेक्शन बंद करण्यात आले आहे.
तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत महसूलचे नायब तहसीलदार प्रशांत पाटील, मंडल अधिकारी संजय गाढे, वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता विनायक इंगळे, सहायक अभियंता दत्ता पगार, आलेशकुमार लंके, नामदेव शेळके यांच्यासह २७ कर्मचारी, पाटबंधारे खात्याचे उपअभियंता आर. टी. बागुल, शाखा अभियंता ए. के. आचट, वावी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मुख्तार सय्यद यांच्यासह सहा पोलीस कर्मचारी यांच्या संयुक्त पथकाने सदर कारवाई केली. (वार्ताहर)

Web Title: 26 power supply breaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.