वन्य प्राण्यांची तहान भागविण्यासाठी २६ पाणवठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:14 AM2021-05-07T04:14:45+5:302021-05-07T04:14:45+5:30

शहर परिसराचा पारा ३८ अंशाच्या पार गेला आहे. पुढील दाेन महिने उन्हाचा तडाखा वाढण्याचा अंदाज आहे. यंदाच्या समाधानकारक पावसामुळे ...

26 reservoirs to quench the thirst of wild animals | वन्य प्राण्यांची तहान भागविण्यासाठी २६ पाणवठे

वन्य प्राण्यांची तहान भागविण्यासाठी २६ पाणवठे

googlenewsNext

शहर परिसराचा पारा ३८ अंशाच्या पार गेला आहे. पुढील दाेन महिने उन्हाचा तडाखा वाढण्याचा अंदाज आहे. यंदाच्या समाधानकारक पावसामुळे जंगलातील तलाव, झऱ्यांना अद्याप पाणी आहे. यावर वन्यप्राणी आपली तहान भागवत आहेत. या महिन्यात बरेच जलस्राेत आटण्याची शक्यता आहे. पाणीसाठे संपुष्टात आले तर वन्यप्राण्यांना भटकंती करावी लागते. पाण्यासाठी हाेणारी भटकंती थांबविण्यासाठी पाणवठे तयार केले जाणार आहेत. उपविभागीय वनकार्यालयाने फेब्रुवारी महिन्यात २६ पाणवठ्यांचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर केला आहे. निंबायती, दहिदी, झाडी, गरबड आदी जंगल क्षेत्रांमध्ये पाणवठे तयार केले जातील. चिंचवे व पाेहाेणे परिसरात पाणी उपलब्ध आहे. गरज भासल्यास येथेही पाणवठे तयार केले जातील, असे कांबळे यांनी सांगितले.

इन्फो

प्लास्टिक ड्रमचा वापर

सध्या प्लास्टिक ड्रम कापून त्याचा पाणी साठविण्यासाठी वापर हाेत आहे. गेल्या वर्षीही ड्रमचा उपयाेग करण्यात आला हाेता. दहा ठिकाणी ड्रम ठेवण्यात आले हाेते. जंगलात हरीण, ससे, बिबटे, तरस, लांडगे यांचा प्रामुख्याने वावर दिसून येताे. टँकरद्वारे पाणी आणून ड्रममध्ये भरले जात आहे. बरेच नागरिक स्वमालकीच्या विहिरीतून माेफत पाणी देत सहकार्य करत आहेत.

Web Title: 26 reservoirs to quench the thirst of wild animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.