नाशिकच्या तोफखान्यात 'धडे' घेणारे २६०० अग्निवीर म्हणतात 'जय हिंद सहाब, हम यहा सब खुश हैं...!

By अझहर शेख | Published: February 13, 2023 03:22 PM2023-02-13T15:22:57+5:302023-02-13T15:23:04+5:30

नाशिक : ‘यहां सब खुश हैं ना..? असा प्रश्न केला असता सर्वांनी एका उंच स्वरात ‘जी हां सहाब, हम ...

2,600 firemen taking 'lessons' at the Nashik Artillery say 'Jai Hind Sahab, Hum Yaha Sab Khush Hain...! | नाशिकच्या तोफखान्यात 'धडे' घेणारे २६०० अग्निवीर म्हणतात 'जय हिंद सहाब, हम यहा सब खुश हैं...!

नाशिकच्या तोफखान्यात 'धडे' घेणारे २६०० अग्निवीर म्हणतात 'जय हिंद सहाब, हम यहा सब खुश हैं...!

Next

नाशिक :

‘यहां सब खुश हैं ना..? असा प्रश्न केला असता सर्वांनी एका उंच स्वरात ‘जी हां सहाब, हम खुश हैं...’ असा प्रतिसाद दिला. अग्निवीर हे आधुनिक व सक्षम असे सैनिक असायला हवे, तुमच्यावर सैन्यदलाला व समाजाला अभिमान वाटायला हवा, अशी कामगिरी करत स्वत:ला सिद्ध करा असा गुरुमंत्र स्कुल ऑफ आर्टीलरीचे कमान्डंट तथा रेजिमेंट ऑफ आर्टीलरीचे कर्नल कमान्डंट लेफ्टनंट जनरल एस.हरिमोहन अय्यर यांनी दिला.

भारतीय सैन्याचा पाठीचा कणा असलेल्या नाशिकरोड तोफखाना केंद्राचा देदिप्यमान इतिहास आहे. या केंद्रातून प्रशिक्षण घेऊन देशसेवेत दाखल झालेल्या सैनिकांनी वैभवशाली कामगिरी करत देशसेवेत योगदान दिले आहे. ‘फौज में मौज’ हा विचार प्रशिक्षणार्थी अग्निवीरांनी मनात आणू नये, असेही अय्यर यावेळी म्हणाले.

भारत सरकारच्या अग्निपथ योजनेअंतर्गत पंचवीशीतील तरुण मोठ्या संख्येने नाशिकरोडच्या तोफखाना केंद्रात सैन्य प्रशिक्षणाचे धडे गिरवत आहेत. बारावी उत्तीर्ण करुन दाखल झालेले हे युवक दिवस-रात्र एक करत आहेत. पहिल्या टप्प्यात २६००पेक्षा जास्त युवक याठिकाणी अग्निवीर म्हणून प्रशिक्षण घेत आहेत. ३१ आठवड्यांचे खडतर सैनिकी प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर ‘अग्निवीर’ देशसेवेत दाखल होणार आहेत. तोफखान्यामधील प्रशिक्षकांकडून सैनिकी प्रशिक्षणाचे धडे त्यांना दिले जात आहेत. सोमवारी (दि.१३) सकाळी येथील ‘ग्यानी स्टेडियम’च्या मैदानावर अग्निवीरांच्या तुकडीसोबत अय्यर यांनी थेट संवाद साधला. त्यावेळी कमान्डंट ब्रिगेडियर ए.रागेश यांच्यासह अन्य लष्करी अधिकारी उपस्थित होते.

आपल्या शरिरासह मेंदूलाही सक्षम करा. यासाठी वाचनशक्ती विकसित करा. मेंदू शक्तीशाली नसेल तर बलवान शरिराचा उपयोग नाही. पहिल्या टप्प्यात सैन्यात दाखल होणाऱ्या अग्निवीरांच्या विक्रमांपासून येणारे भावी अग्निवीर प्रेरणा घेतील, अशी कामगिरी करावी, असा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. कुठलेही ऑपरेशन फत्ते करण्यासाठी तल्लख, स्मार्ट बुद्धीमत्ता गरजेची असते, असे सांगत अग्निवीर आदर्श नागरिक व आधुनिक सैनिक म्हणून स्वत:ला सिद्ध करण्याची क्षमता ठेवतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Web Title: 2,600 firemen taking 'lessons' at the Nashik Artillery say 'Jai Hind Sahab, Hum Yaha Sab Khush Hain...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.