जिल्ह्यातील २६ हजार रिक्षाचालकांना मिळणार मदत, इतरांचे काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:15 AM2021-04-20T04:15:36+5:302021-04-20T04:15:36+5:30
दरम्यान, शासनाकडून मिळणारे दीड हजार रुपये किती दिवस पुरणार असा सवालही रिक्षाचालकांकडून उपस्थित केला जात आहे. मागील वर्षभरापासून रिक्षाचालकांना ...
दरम्यान, शासनाकडून मिळणारे दीड हजार रुपये किती दिवस पुरणार असा सवालही रिक्षाचालकांकडून उपस्थित केला जात आहे. मागील वर्षभरापासून रिक्षाचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात प्रवासी बसविण्यावर शासनाचे निर्बंध यामुळे पूर्वीसारखा आता व्यवसायही होत नाही. कशीतरी हाता तोंडाची गाठ पडते. मागील वर्षभरापासून तर विद्यार्थी वाहतूकही बंद आहे. त्याचाही मोठा फटका बसला आहे. यामुळे अडचणींचा डोंगर रिक्षाचालकांसमोर उभा आहे.
चौकट-
जिल्ह्यातील एकूण रिक्षाचालक २६०००
नाशिक शहरातील रिक्षाचालक १५०००
कोट -
शासनाने आता कुठे घोषणा केली आहे. प्रत्यक्ष खात्यावर पैसे येण्यास किती दिवस लागतील याचा काही अंदाज नाही. परवाना नसलेल्या रिक्षाचालकांनी काय करायचे याचा निर्णयही शासनाने घ्यावा - महेश दंडगव्हाळ
कोट -
परवाना काढून स्वत:ची रिक्षा घेणे ही मोठी खर्चाची बाब आहे. इतका पैसा आमच्याकडे नाही. त्यामुळे भाडे तत्त्वावर रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. आता तर रिक्षाचे धंदेही पहिल्यासारखे राहिलेले नाहीत. - गौतम कांबळे
कोट -
पेट्रोलची लेव्हल सोडून दिवसाला ४०० ते ५०० रुपयांचा व्यवसाय होतो. तेव्हा कुठे घर चालते. शासनाने केवळ १५०० रुपयांची मदत जाहीर केली आहे. ते किती दिवस पुरणार. यापेक्षा काहीतरी नोकरी केलेली बरी
- बाळू पवार