सिन्नर तालुक्यात २७ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 10:30 PM2020-06-07T22:30:06+5:302020-06-08T00:30:15+5:30
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखतानाच कुणीही यात बळी जाऊ नये यासाठी अहोरात्र झटणाºया आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना यश येत आहे. सिन्नरच्या आरोग्य यंत्रणेने कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वीरीत्या उपचार करून त्यांना टप्प्या-टप्प्याने डिस्चार्ज दिला आहे.
सिन्नर : राज्यात, देशात तसेच जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखतानाच कुणीही यात बळी जाऊ नये यासाठी अहोरात्र झटणाºया आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना यश येत आहे. सिन्नरच्या आरोग्य यंत्रणेने कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वीरीत्या उपचार करून त्यांना टप्प्या-टप्प्याने डिस्चार्ज दिला आहे. आतापर्यंत तालुक्यात तब्बल ३५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, त्यापैकी जवळपास २७ रुग्णांवर यशस्वीरीत्या उपचार करून त्यांना कोरोनामुक्त करण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे.
राज्यभरात विशेषत: मुंबई, पुणे या शहरांत कोरोना धुमाकूळ घालत असताना पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊन काळात सिन्नर तालुक्यात प्रशासनासह आरोग्य विभागाने विशेष काळजी घेतल्याने कोरोनाचा शिरकाव होऊ शकला नव्हता. दुसºया टप्प्यातील लॉकडाऊन काळात नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. अगदी लासलगाव येथे रुग्ण आढळून येत असतानाही सिन्नर तालुका कोरोनापासून दूर होता. तथापि मालेगाव येथे कोरोनाबाधित रुग्णाच्या अंत्यविधीस गेलेल्या वारेगाव येथील पितापुत्रास कोरोनाची बाधा झाली आणि सिन्नर तालुक्यात एप्रिलच्या मध्यात कोरोनाचा शिरकाव झाला. तथापि आरोग्य विभागाने कुठलीही सुुविधा नसताना अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्या मदतीने कठोर पावले उचलत कोरोना बाधितांची संख्या दोनवर रोखण्यात यश मिळविले होते. तथापि गेल्या १५ दिवसांत मुंबईसह कोरोनाबाधित क्षेत्रातून तालुक्याच्या ग्रामीण भागात येणाºया नागरिकांमुळे तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या अचानक वाढली होती.
विशेषत: दापूर येथे दिवसागणिक रुग्ण आढळून येत असल्याने कोरोनाचा विस्फोट होतो की काय अशी भीती परिसरात व्यक्त केली जात होती.
येथील उपजिल्हा रुग्णालयातून बुधवारी देशवंडी येथील २० वर्षांची तरुणी, फुलेनगर येथील ५४ वर्षे वयाचा पुरुष, संगमनेर येथील ३८ वर्षे वयाचे दापूरला प्रॅक्टिस करणारे डॉक्टर, दापूर येथील ४२ वर्षे वयाचे पुरुष कोरोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर गुरुवारी देशवंडी येथील ७३ वर्षीय वृद्ध, ४० व २५ वर्षीय पुरुष आणि १६ वर्षीय मुलगा कोरोनावर मात करून घरी परतले. ४ जून बुधवारी दापूर येथील ५, फुलेनगर (माळवाडी) येथील ३ तर निमगाव-सिन्नर येथील तरुणाला घरी सोडण्यात आले. त्यामुळे आता तालुक्यात केवळ ७ रुग्ण असून त्यापैकी दोघांवर नाशिक येथे तर ५ जणांवर सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांनी दिली. दापूर येथील ६ वर्षीय बालक, ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह ६२, ४८ व ३५ वर्षीय महिला तर फुलेनगर येथील २२ वर्षीय तरुणासह ३९ व ३७ वर्षीय महिला तसेच मूळचा निमगाव-सिन्नर येथील व सध्या नाशिक येथे वास्तव्यास असलेल्या तरुणही कोरोनातून सहीसलामत ठीक झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात आता केवळ दापूर येथील ४२ वर्षीय पुरुष, १२ व ८ वर्षीय मुली, गुळवंच येथील ४४ वर्षीय पुरुष व कोनांबेतील २० वर्षीय तरुणीवर उपचार सुरु आहेत तर दोन रुग्णांवर नाशिक येथे उपचार सुरु आहेत.