आरटीई प्रवेशाला २७पर्यंत संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:50 AM2019-06-24T00:50:55+5:302019-06-24T00:51:11+5:30
नाशिक : आरटीई प्रवेशासाठी दुसरी सोडत जाहीर झाल्यानंतर पालकांना निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया २७ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन शिक्षण ...
नाशिक : आरटीई प्रवेशासाठी दुसरी सोडत जाहीर झाल्यानंतर पालकांना निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया २७ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे. आरटीईच्या दुसऱ्या सोडतीत ३६५ शाळांत दोन हजार ३७ मुलांची निवड झाली असून, १७ ते २७ जून या कालावधीत पालकांना पडताळणी समितीकडे जाऊन प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
दुसºया सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती पालकांना एसएमएसद्वारे तसेच आरटीईच्या संकेतस्थळावर अॅप्लिकेशन व्हाइज डिटेल्स यावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिक्षणहक्क कायद्यानुसार (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये राखीव असणाºया २५ टक्के जागांवर प्रवेश दिला जातो. दरवर्षी डिसेंबरमध्ये सुरू होणारी ही प्रक्रिया यंदा फेब्रुवारीच्या उत्तरार्धात सुरू झाली. त्यानंतर एप्रिलच्या दुसºया आठवड्यात पहिली सोडत जाहीर करण्यात आली. त्यानंतर दोन महिने झाल्यानंतर अखेर दुसरी सोडत जाहीर झाली. पहिल्या सोडतीनंतर प्रवेश घेण्यास दोनदा मुदतवाढ देण्यात आली. त्यात महिनाभराचा कालावधी गेला. त्यानंतर पालक दुसºया सोडतीच्या प्रतीक्षेत असताना अर्ज दुरुस्तीसाठी दोनदा मुदतवाढ देण्यात आली. त्यातही महिनाभराचा कालावधी गेल्याने पहिल्या सोडतीनंतर तब्बल दोन महिने उलटल्यानंतर दुसरी सोडत जाहीर करण्यात आली असून, अजूनही अनेक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.
पहिल्या फेरीत २ हजार ४८४ प्रवेश
आरटीई प्रवेशप्र्रक्रियेच्या पहिल्या फेरीत जिल्ह्यातील ४५७ शाळांमध्ये आरटीईच्या ५७३५ जागांसाठी सोडत काढण्यात आली होती. त्यासाठी जिल्हाभरातून सुमारे संख्या १४ हजार ७७५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यातून केवळ ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांनाच प्रवेशाची संधी मिळाली होती. परंतु प्रत्यक्षात मात्र २ हजार ४८४ विद्यार्थ्यांचेच प्रवेश होऊ शकले होते. त्यामुळे उर्वरित जागांसाठी काढण्यात आलेल्या दुसºया सोडतीत दोन हजार ३७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे.