इगतपुरीतील २७ गावे निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:15 AM2021-04-07T04:15:06+5:302021-04-07T04:15:06+5:30

जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत इगतपुरी तालुक्याचा मृत्युदर फक्त १.८ इतका आहे. तालुक्यात ४८ हजार कोरोना तपासण्या झाल्या असून २१५० ...

27 villages in Igatpuri are negative | इगतपुरीतील २७ गावे निगेटिव्ह

इगतपुरीतील २७ गावे निगेटिव्ह

Next

जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत इगतपुरी तालुक्याचा मृत्युदर फक्त १.८ इतका आहे. तालुक्यात ४८ हजार कोरोना तपासण्या झाल्या असून २१५० पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यात आले. सद्यस्थितीत ३७० ॲक्टिव्ह रूग्ण आहेत. मुंबई ते नाशिक महामार्गावर जिल्ह्याच्या प्रवेशद्वार असलेल्या इगतपुरी, घोटी, खंबाळे, माणिकखांब, मुंढेगाव, पाडळी, गोंदे, वाडीवरहे, विल्होळी अशा गावांचा समावेश असून या प्रमुख गावांसह तालुक्यातील ४० ते ५० गावांमधून मुंबईला नोकरी व उद्योगासाठी हजारोंच्या संख्येने चाकरमानी ये -जा करीत असतात. तालुक्यातून जाणाऱ्या कामगारांपैकी २५ टक्के मुंबई येथे ये - जा करीत असतात. या सर्व गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. इगतपुरी तालुक्याची लोकसंख्या २ लाख ७७ हजार ४८८ असून इगतपुरी वगळता ग्रामीण २ लाख ४१ हजार ४२७ असून बाधित न झालेल्या गावांची लोकसंख्या २८०९९ एवढी आहे.या गावातील बहुतांश नागरिक व्यापारासाठी तालुक्यातच कार्यरत असून मुंबईकडे जाणारा वर्ग फार कमी स्वरूपाचा आहे. यामध्ये प्रादुर्भाव न झालेली गावे ही अत्यंत छोटी असून वाडया-पाड्यांचा यात सहभाग आहे. ३६ गावातील मुंबईकडे राहणारे कामगार बहुतांश रेल्वे कर्मचारी असून मागील वर्षी तालुक्यामध्ये येणाऱ्या नोकरदारांची संख्या ११ हजार ६०० अशी होती. परंतु लॉकडाऊन उठल्याने हे कामगार पुन्हा नोकरीसाठी आपल्या कार्यस्थानी गेले असल्याने सद्य स्थितीत ये-जा करणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याएवढी आहे. वर्षभर गणपती उत्सव, नवरात्री, दिवाळी, दसरा, पाडवा, होळी असे विविध सण साध्या पध्दतीने करण्यात आले. स्थानिक ग्रामपंचायतीने नागरिकांची ये - जा थांबविण्यासाठी मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी गावबंदी करण्यात आली होती. तालुका आरोग्य यंत्रणेकडून बाहेरून येणाऱ्या व्यक्तींची तपासणी काही महिन्यांपूर्वी होत होती. परंतु आता स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत संबंधित कामगारांविषयी निर्बंध करण्यात येत आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेली २७ गावे व कंसात लोकसंख्या - गावंडे-७९४, जुमांडे- ६९५, वाघ्याचीवाडी - ५३५, पारदेवी - ८७४, त्रिगलवाडी-२२८४, बिटूरली-८०३, पिंपळगाव मोर -९८५, अवचितवाडी -६२५, दौंडत- ९००, उंबरकोण- १२५, कुरुंगवाडी-१००५, मायदरा/धानोशी- १७३०, घोडेवाडी-४१०, शिरेवाडी-४८५, मांजरगाव-८१०, रामनगर-६७०, राहुल नगर-९४०, करोळे-६७५, रायंबे-११६५, धारणोली-११४७, कुर्नोली-८८३, वांजोळे-६७८, शेवगेडांग-२०९४, म्हसुरली-१२७५, कुशेगाव-२४९२, कृष्णा नगर-११८०, लक्ष्मीनगर -७४० अशी लोकसंख्या आहे.

कुरुंगवाडी गाव अतिदुर्गम भागात येत असून ग्रामपंचायतीच्यावतीने शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन केले. इतर गावांशी संपर्क ठेवला नाही. नागरिकांना वेळोवेळी प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांना रोगाचे गांभीर्य लक्षात आणून वेळोवेळी तपासण्या करून घेतल्याने आम्ही कोरोनाचा प्रादुर्भावापासून लांब ठेवू शकलो. वर्षभराच्या काळात सुद्धा एकही रुग्ण कुरुंगवाडी येथे नाही.

- मनीषा कलंकार, ग्रामसेविका

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना आखल्याने तसेच वेळोवेळी फवारणी, स्वच्छता गावात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून गावपातळीवर विविध उपाययोजना आखण्यात आम्ही यशस्वी झालो. तसेच संपूर्ण गावाने ग्रामपंचायत व प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करून स्वतःची जबाबदारी समजल्यामुळे कुरुंगवाडीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात आम्ही यशस्वी झालो.

- गोविंद सावंत, सरपंच, कुरुंगवाडी

===Photopath===

060421\06nsk_35_06042021_13.jpg~060421\06nsk_36_06042021_13.jpg

===Caption===

गोविंद सावंत~मनिषा कलंकार

Web Title: 27 villages in Igatpuri are negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.