जिल्ह्यात २७२ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:44 AM2021-01-08T04:44:12+5:302021-01-08T04:44:12+5:30
नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (दि. ०६) एकूण २७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ३४२ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर ...
नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (दि. ०६) एकूण २७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ३४२ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर मनपा हद्दीत ४ आणि ग्रामीण भागात झालेल्या २ याप्रमाणे एकूण ६ रुग्णांची भर पडल्याने बळी गेलेल्यांची संख्या १९९७ वर पोहोचली आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ११ हजार ६०६ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख ७ हजार ८१५ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर १९९७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९६.६० वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९७.१५, नाशिक ग्रामीण ९५.९९, मालेगाव शहरात ९२.८९, तर जिल्हाबाह्य ९३.८३ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या १७९४ बाधित रुग्णांमध्ये ११००रुग्ण नाशिक शहरात, ५२५ रुग्ण नाशिक ग्रामीणला, १५४ रुग्ण मालेगावमध्ये, तर १५ रुग्ण जिल्हाबाह्य क्षेत्रामधील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या चार लाख ४९ हजार ९९३ असून, त्यातील ३ लाख ३६ हजार ४७२ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख ११ हजार ६०६ रुग्ण बाधित आढळून आले असून, १ हजार ९१५ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.