जिल्ह्यात २७३ रुग्ण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:18 AM2021-01-16T04:18:36+5:302021-01-16T04:18:36+5:30
नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १५) एकूण २१७ रुग्ण नव्याने कोरोनाबाधित झाले असून २७३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले ...
नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १५) एकूण २१७ रुग्ण नव्याने कोरोनाबाधित झाले असून २७३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण भागात एक, तर नाशिक शहरात तीन असा चौघांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या २०२५ वर पोहोचली आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १३ हजार ३७३ वर पोहोचली असून त्यातील १ लाख ९ हजार ९८८ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर १३६० रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९७.०१ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९७.५७, नाशिक ग्रामीण ९६.४३, मालेगाव शहरात ९२.८३, तर जिल्हाबाह्य ९५.०६ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या ४ लाख ६६ हजार ७१५ असून त्यातील ३ लाख ५२ हजार ६५९ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख १३ हजार ३७३ रुग्ण बाधित आढळून आले असून ६८३ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.