अमरनाथ यात्रेत २७६ भाविक अडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 12:41 AM2018-07-06T00:41:48+5:302018-07-06T00:41:54+5:30
नाशिक : काश्मीरमधील अमरनाथ यात्रेसाठी गेलेले नाशिकचे सुमारे २७६ भाविक गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बालटालजवळ खराब हवामानामुळे अडकून पडले असून, भाविक सुरक्षित असल्याचा निर्वाळा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
नाशिक : काश्मीरमधील अमरनाथ यात्रेसाठी गेलेले नाशिकचे सुमारे २७६ भाविक गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बालटालजवळ खराब हवामानामुळे अडकून पडले असून, भाविक सुरक्षित असल्याचा निर्वाळा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
२८ जूनपासून अमरनाथ यात्रा सुरू झाली असून, नाशिकचे भाविक मातोश्री ट्रॅव्हल्सच्या वतीने २९ जून रोजी जम्मू-काश्मीरकडे रवाना झाले आहेत. परंतु गेल्या दोन दिवसांपासून वादळ, पाऊस व भूस्खलनामुळे यात्रा खंडित होत असल्याने नाशिकचे काही भाविक मागे-पुढे झाले आहेत. अमरनाथ गुंफेजवळ १०२ भाविक कालपासून शिबिरात अडकले आहेत. तर अन्य भाविक बालटालच्या लष्कराच्या शिबिरात सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. या भाविकांचे भ्रमणध्वनी बंद झाल्याने त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क तुटल्यामुळे काळजी व्यक्त केली जात होती. सुरक्षिततेचा प्रश्न दरवर्षी उत्तर भारत, अमरनाथ, कैलास मानसरोवर, दक्षिण भारतात हजारो भाविक यात्रेकरू नाशिकमधून रवाना होत असतात; परंतु गेल्या काही वर्षांपासून उत्तर भारतात नैसर्गिक आपत्तीच्या घटना पावसाळ्यात घडू लागल्या असून, त्यातून भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. ढगफुटी, भूस्खलन, महापुराच्या घटनांमध्ये भाविक अडकून पडल्याचे प्रकारही अनेकवेळा घडले आहेत.