जिल्ह्यात २७९ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 01:20 AM2020-12-15T01:20:36+5:302020-12-15T01:21:06+5:30

जिल्ह्यात सोमवारी (दि. १४) एकूण २७९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर २३७ रुग्ण नव्याने कोरोनाबाधित झाले आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागात २ नाशिक शहरात १ याप्रमाणे ३ जणांचा मृत्यू झाला असून एकूण बळींची संख्या १,८६७ वर पोहोचली आहे.

279 corona free in the district | जिल्ह्यात २७९ कोरोनामुक्त

जिल्ह्यात २७९ कोरोनामुक्त

Next

नाशिक : जिल्ह्यात सोमवारी (दि. १४) एकूण २७९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर २३७ रुग्ण नव्याने कोरोनाबाधित झाले आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागात २ नाशिक शहरात १ याप्रमाणे ३ जणांचा मृत्यू झाला असून एकूण बळींची संख्या १,८६७ वर पोहोचली आहे.

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ५ हजार ५७२ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख २३८ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. ३,४६७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९४.९५ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९५.४१, नाशिक ग्रामीण ९४.३२, मालेगाव शहरात ९२.६२, तर जिल्हाबाह्य ९२.५३ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ३,४६७ बाधित रुग्णांमध्ये २२५२ रुग्ण नाशिक शहरात, १,०३२ रुग्ण नाशिक ग्रामीणला, १५७ रुग्ण मालेगावमध्ये, तर २६ रुग्ण जिल्हाबाह्य क्षेत्रामधील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या चार लाख ३ हजार ८६५ असून, त्यातील २ लाख ९७ हजार ४८६ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख ५ हजार ५३२ रुग्ण बाधित आढळून आले असून, ८०७ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.

Web Title: 279 corona free in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.