एमपीएससी पूर्वपरीक्षेत २८ जणांचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 11:01 AM2018-08-04T11:01:34+5:302018-08-04T11:01:58+5:30
निकाल : २६ आॅगस्टला होणार मुख्य परीक्षा
नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ‘ब’ श्रेणीतील राज्य कर निरीक्षक (एसटीआय) पदाच्या नियुक्त्यांसाठी घेण्यात आलेल्या पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, नाशिक जिल्ह्यातील सुमारे २८ उमेदवारांना या स्पर्धा परीक्षेतील पहिला टप्पा पार करण्यात यश आले आहे. पूर्वपरीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी परीक्षेसाठी केलेल्या आॅनलाइन अर्जातील माहितीच्या आधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी विहित कालावधीत अर्ज करणाºया अर्हताप्राप्त उमेदवारांना या परीक्षेस प्रवेश दिला जाणार असून, मुख्य परीक्षेचा संयुक्त पेपर क्रमांक एक २६ आॅगस्टला घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
इन्फो-
असा आहे कटआॅफ
* खुला प्रवर्ग
सर्वसाधारण ५५ गुण
महिला ४८ गुण
क्रीडा ४३ गुण
—-
* अनुसूचित जाती
सर्वसाधारण ५० गुण
महिला ४४ गुण
क्रीडा ३२ गुण
—-
* अनुसूचित जमाती
सर्वसाधारण ४७ गुण
महिला ४० गुण
—-
* भटक्या जमाती (ब) सर्वसाधारण ५४ गुण
* एसबीसी सर्वसाधारण ५१ गुण
* भटक्या जमाती (क) ५५ गुण
* ओबीसी सर्वसाधारण ५५ गुण
——
* शारीरिक दिव्यांग
अंध व अल्पदृष्टी ४१ गुण
कर्णबधिर ३४ गुण
मतिमंद ४५ गुण