२८ लाखांचा मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 12:41 AM2017-08-11T00:41:55+5:302017-08-11T00:42:19+5:30
दिंडोरीतील मद्यनिर्मिती कंपनीतून नांदेड जिल्ह्यासाठी पाठविलेल्या लाखो रुपये किमतीच्या मद्यसाठ्याचा परस्पर अपहार करणाºया ट्रकचालक-मालकासह आठ संशयितांना आडगाव पोलिसांनी अटक केली आहे़ या संशयितांकडून २८ लाख रुपयांचा मद्याचा साठा जप्त केला असून, संशयितांवर अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचवटी : दिंडोरीतील मद्यनिर्मिती कंपनीतून नांदेड जिल्ह्यासाठी पाठविलेल्या लाखो रुपये किमतीच्या मद्यसाठ्याचा परस्पर अपहार करणाºया ट्रकचालक-मालकासह आठ संशयितांना आडगाव पोलिसांनी अटक केली आहे़ या संशयितांकडून २८ लाख रुपयांचा मद्याचा साठा जप्त केला असून, संशयितांवर अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लॉजिस्टीक ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक धर्मेंद्र मंडलोई यांच्या सांगण्यावरून आडगावमधील ओम ट्रान्सपोर्टचे चालक विजय कोठावले यांनी २७ जुलै रोजी दिंडोरीतील परनॉड रकार्ट इंडिया या मद्य कंपनीतून ट्रकचालक पोपट नाथा बागुल याचा मालट्रकमध्ये (एम. एच. १८, एम. २०२८) मध्ये ८४५ विदेशी दारूचे बॉक्स नांदेडला पाठविले़ यानंतर दोन दिवसांनंतर ट्रकचालक बागुल यास विचारणा केली असता नांदेड जवळील गोटूर येथे ट्रक नादुरुस्त झाल्याचे सांगितले़ कोठावले यांनी या ट्रकबाबत मंडलोई यांना कळविलेअसता संशय आल्याने मंडलोई हे खासगी वाहनाने गोटूरकडे निघाले व ट्रकची तपासणी केली असता ८४५ पैकी ३७६ बॉक्सचा अपहार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले़ याप्रकरणी प्रथम मंठा पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र तो आडगाव हद्दीत घडल्याने नाशिक पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता़ आडगाव पोलिसांनी या सात संशयितांना अटक केली असून, संजय कांबळे हा फरार आहे़ ही कामगिरी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी, सहायक पोलीस निरीक्षक काकासाहेब पाटील, मुशीर काझी, संजीव जाधव, दत्ता खुळे, वैभव परदेशी, वैभव खांडेकर, यशवंत गांगुर्डे, अनिल केदार यांनी केली़