पाटील माध्यमिक विद्यालयात २८ वर्षांनी भरला दहावीचा वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:44 AM2019-01-30T00:44:28+5:302019-01-30T00:45:00+5:30
२८ वर्षांपूर्वी झालेली भांडणे व अबोला बाजूला सारून गंगापूर येथील दे. ना. पाटील माध्यमिक विद्यालयातील ९० च्या तुकडीतील दहावीचा वर्ग पुन्हा एकदा तब्बल २८ वर्षांनी भरला व सर्वांच्या उपस्थितीत शाळेची घंटा वाजविण्यात आली.
गंगापूर : २८ वर्षांपूर्वी झालेली भांडणे व अबोला बाजूला सारून गंगापूर येथील दे. ना. पाटील माध्यमिक विद्यालयातील ९० च्या तुकडीतील दहावीचा वर्ग पुन्हा एकदा तब्बल २८ वर्षांनी भरला व सर्वांच्या उपस्थितीत शाळेची घंटा वाजविण्यात आली.
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर वेगवेगळ्या दिशांना गेलेले हे विद्यार्थी नुुकतेच पुन्हा एकदा एकत्र आले. निमित्त होते ते स्नेहमेळाव्याचे. दे. ना. पाटील विद्यालयातील १९९० दहावीच्या तुकडीतील अशाच चार-पाच खोडकर मुलांनी एकत्र आपल्या सवंगड्यांना एकत्र केले आणि दहावीचा हा वर्ग पुन्हा भरवला. नितीन धुमणे, झुंझार पवार, अरुण ताठे, सुरेश मोरे, राजेंद्र मोहिते, कोकिळा वायचळे, सुजाता मोहिते या विद्यार्थ्यांनी सर्वांना एकत्र आणले. शाळेच्या कार्यक्रमप्रसंगी दिवंगत शिक्षक तसेच विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक वि. म. बच्छाव, टिकमदास बैरागी, मार्तंड, व. मो. कदम, भाऊसाहेब कदम, बा. वा. खैरनार, गुंजाळ, भंवर या शिक्षकांप्रती विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.