२८ वर्षांनी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 01:01 PM2019-05-08T13:01:07+5:302019-05-08T13:02:59+5:30
जायखेडा : येथील जनता इंग्लिश स्कूलच्या १९९१ सालातील एकता ग्रुपच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वर्गशिक्षक बी. एम. ठाकरे व एन. पी. वाघ उपस्थित होते.
जायखेडा : येथील जनता इंग्लिश स्कूलच्या १९९१ सालातील एकता ग्रुपच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून वर्गशिक्षक बी. एम. ठाकरे व एन. पी. वाघ उपस्थित होते. सरस्वती पुजन करु न कार्यक्र मास सुरु वात करण्यात आली. यानंतर दिवंगत मित्र - मैत्रिणींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी २८ वर्ष जुन्या आठवणीना उजाळा देत शालेय जीवनात शिक्षकांनी दिलेले ज्ञान व संस्कारा प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. सन १९९१ मध्ये दहावीची शालांत परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर वेगवेगळ्या दिशेला गेलेले मित्र-मैत्रिणींनी ठीक ठिकाणाहून येऊन भेटल्याने भारावून गेले होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्नेहभेटीचा आनंद दिसत होता. भेटीला भावनेची किनार होती. सुमारे तीस पस्तिस माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी यावेळी उपस्थित होते. सर्वांनी एकमेकांच्या नोकरी व्यवसाय, कुटुंबाविषयी जाणुन घेतले. अनेक वर्षांनी एकञ आल्याने विद्यार्थी दशेतील जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. यावेळी शालेय जीवनात चांगल्या कामासाठी मिळालेली शाब्बासकी तर अभ्यासात कुचराई केल्याबद्दल मिळालेली शिक्षा, यातुन घेतलेला बोध व जीवणाला मिळालेली कलाटणी याचे अनुभव अनेकांनी यावेळी कथन केले. अनेक वर्षांनी मिञ भेटलेल्याचा परमोच्च आनंद सर्वांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होता. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याच्या संगोपनाचा निश्चय यावेळी करण्यात आला. पुढील कार्यक्र म घेण्याबाबतही चर्चा करण्यात आली व भविष्यात एकता ग्रुप च्या वतीने सामाजिक उपक्र म राबण्याबाबतही नियोजन करण्यात आले. सूत्रसंचालन जयंत देवरे यांनी तर प्रास्ताविक जयवंत खैरनार यांनी केले.
किरण पाटील यांनी आभार मानले.