कांदा दरात उसळी २८०० कमाल भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 07:16 PM2020-09-08T19:16:47+5:302020-09-08T19:17:54+5:30
अभोणा : कळवण बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात मंगळवारी (दि.८) ५६३ ट्रॅक्टर्सद्वारे ११ हजार क्टिंटल कांद्याची आवक होऊन कमाल २८०० रु पये, किमान ८०० रु पये तर सरासरी २२०० रु पये प्रति क्टिंटल भाव मिळाला.
Next
ठळक मुद्देतीन दिवसात भावात ५०० रु पयाने वाढ
अभोणा : कळवण बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात मंगळवारी (दि.८) ५६३ ट्रॅक्टर्सद्वारे ११ हजार क्टिंटल कांद्याची आवक होऊन कमाल २८०० रु पये, किमान ८०० रु पये तर सरासरी २२०० रु पये प्रति क्टिंटल भाव मिळाला.
गेल्या तीन दिवसात भावात ५०० रु पयाने वाढ झाली आहे. भावात सुधारणा होत असल्याने कांदा उत्पादक मोठया प्रमाणावर माल विकण्यासाठी आवारात आणत आहेत. असे असले तरी यंदा वातावरणामुळे चाळीत साठवलेल्या कांदयाचे सडण्याचे प्रमाण वाढल्याने निम्मा कांदा फेकून देण्याची पाळी कांदा उत्पादकांवर आल्यानेभाव वाढीने झालेल्या खर्चाचीच गोळाबेरीज होणार असल्याचे चित्र आहे.