३१ जुलैपर्यंत २ हजार ८५० कर्मचाऱ्यांना मिळणार पीएफ स्लीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:10 AM2021-07-23T04:10:58+5:302021-07-23T04:10:58+5:30
वेतनपथक व भविष्य निर्वाह निधी कार्यालय (माध्यमिक) नाशिक यांच्यातर्फे जिल्ह्यातील अनुदानित माध्यमिक शाळांतील कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीच्या पीएफ ...
वेतनपथक व भविष्य निर्वाह निधी कार्यालय (माध्यमिक) नाशिक यांच्यातर्फे जिल्ह्यातील अनुदानित माध्यमिक शाळांतील कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीच्या पीएफ स्लीप वितरणासाठी १३ जुैलपासून सुरू असलेले विशेष शिबिर सुरू करण्यात आले असून या माध्यमामातून संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ३१ जुलैपर्यंत स्लीपचे वाटप करण्यात येणार आहेत. अशा प्रकारे एकूण २ हजार ८५० कर्मचाऱ्यांच्या स्लीपचे वितरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
शिक्षक व शिक्षकेतरांच्या भविष्य निर्वाह निधीच्या पीएफ स्लीप वितरणासाठी सुरू करण्यात आलेल्या शिबिराच्या माध्यमातून नियोजनबद्धरीत्या स्लीपचे वाटप करण्यात येत असून त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांच्या २०१३/२०१४ पासून सन २०१९/२०२० पर्यंत सर्व लेजर पूर्ण भरून ऑनलाइन लेखाचिठ्ठ्या अपडेट होत असल्याने कर्मचाऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. या उपक्रमांतर्गत वेतन अधीक्षक उदय देवरे यांच्यासोबत लेखाधिकारी राजेंद्र जाधव पूर्णवेळ स्लीप अपडेट करण्यासाठी काम करीत असून वरिष्ठ लिपिक राजेंद्र मणियार, रामलाल देवरे, अंजली सरोदे, संगीता क्षत्रिय, वैशाली कडू आदी सर्व स्लीप तपासणी करण्यासाठी काम करीत आहेत. दरम्यान, उर्वरित शाळांसाठी लवकरात लवकर कॅम्प लावून जिल्ह्यातील सर्वच माध्यमिक शाळांतील सर्वच कर्मचाऱ्यांच्या स्लीपचे वितरण करण्यात यावे, अशी मागणी नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे करण्यात आली आहे.