दुसऱ्या सोमवारच्या गर्दीचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 04:37 PM2018-08-19T16:37:28+5:302018-08-19T16:38:13+5:30

 त्र्यंबकेश्वर : श्रावण महिन्यातील श्रावणी सोमवारच्या निमित्त होणाºया गर्दीचे नियोजन त्र्यंबकेश्वर येथे करण्यात आले आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी भाविकांची नेहमीच गर्दी होत असते. परंतू आज रविवारीच कुशावर्तावर असंख्य भाविकांनी दर्शन घेतले.

2nd Monday's crowds | दुसऱ्या सोमवारच्या गर्दीचे नियोजन

दुसऱ्या सोमवारच्या गर्दीचे नियोजन

googlenewsNext
ठळक मुद्देसोमवारी होणारय गर्दीसाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट, त्र्यंबक नगरपरिषद, नाशिक ग्रामीण पोलीस, परिवहन महामंडळ व आरोग्य सेवा आदी यंत्रणांच्या जिल्हा प्रशासन नियोजन केले आहे. यंदाच्या पहिल्या सोमवारी राहिलेल्या उणीवा या वेळेस दुर करण्याचा प्रयत्न केला जाणा

 त्र्यंबकेश्वर : श्रावण महिन्यातील श्रावणी सोमवारच्या निमित्त होणाºया गर्दीचे नियोजन त्र्यंबकेश्वर येथे करण्यात आले आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी भाविकांची नेहमीच गर्दी होत असते. परंतू आज रविवारीच कुशावर्तावर असंख्य भाविकांनी दर्शन घेतले. सोमवारी होणारय गर्दीसाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट, त्र्यंबक नगरपरिषद, नाशिक ग्रामीण पोलीस, परिवहन महामंडळ व आरोग्य सेवा आदी यंत्रणांच्या जिल्हा प्रशासन नियोजन केले आहे. यंदाच्या पहिल्या सोमवारी राहिलेल्या उणीवा या वेळेस दुर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
उद्या दुसरा श्रावणी सोमवारी पहिल्या श्रावण सोमवारपेक्षा व येणा-या तिसरा सोमवार पेक्षा काहीशी कमी भरण्याची शक्यता आहे. तथापि गर्दी जास्त होईल असे गृहीत धरु नच प्रशासनाने येथील होणा-या गर्दीचे नियोजन केले आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या काही विश्वस्तांनीभाविकांना दर्शन अधिक सुलभतेने होण्यासाठी नियोजन केल्याचे सागिंतले. शक्य तो डोके टेकविण्याचा आग्रह न धरता निदान गर्दीच्या वेळेस केवळ देवापुढे हात जोडुन दर्शन करावे पुरोहित वर्गाने एका वेळेस फक्त दोघांना मंदीरात जाण्यास परवानगी दिली आहे. भाविकांकडून विश्वस्त मंडळाला सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या कर्मचा-यांना भाविकांशी वाद न घालता सौजन्याची वागणुक द्यावी अशा सुचना देण्यात आल्या आहेत.
त्र्यंबकेश्वर नगरपालिका आपापली कामे अधिक चांगली करण्याचा प्रयत्न करणार आहे. खरी कसोटी तिस-या सोमवारला लागणार आहे. या वेळेस पोलीस प्रशासन
दुस-या सोमवारच्या नियोजन आजपासुनच सुरु केले आहे.
सोमवार निमित्त प्रदक्षिणेला जाण्यासाठी भाविक आजच आले आहेत. याशिवाय दक्षिण भारत उत्तर प्रदेश आदी राज्यातुन आलेल्या भाविकांनी व प्रदक्षिणार्थी मिळुन गर्दी केली आहे.
हॉटेल लॉजेस भक्त निवास आदींच्या खोल्या काही बुक झाल्या आहेत. उद्या दुसरा सोमवार असल्याने गर्दी तशी कमी राहाणार आहे. तथापि वाहनतळ मात्र पुर्ण भरला आहे.अनेक वाहने त्र्यंबक चेक नाक्याच्या परिसरातील खुल्या रस्त्यावरील जागेत बरीचशी वाहने उभी आहे. म्हणजे शहरात गर्दी होतच असते.

गावच्या लोकांना देखील शनिवार पासुनच वाहने बंद करु न गावात ठेवावी लागतात.जर वाहन घेउन बाहेर गेल्यास गावात घुसण्यास प्रवेश नसतो. मात्र आजारी गरोदर स्त्रिया आदी अत्यावश्यक वेळी मात्र प्रवेश दिला जातो. वाहने दूर अंतरावर उभी केली जातात.
सातशे आठशे पोलीसांची कुमक असते. एखाद्या सिंहस्थ पर्वणीला लाजवेल एवढी गर्दी होत असते.
 

Web Title: 2nd Monday's crowds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.