३९९ हिऱ्यांपासून घडविली मौल्यवान राखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 01:34 AM2018-08-26T01:34:21+5:302018-08-26T01:34:54+5:30
आपला व्यवसाय आणि त्यामधील कलात्मक प्रयोगाच्या आवडीपोटी शहरातील बाफणा डायमंड गॅलॅक्सीचे संचालक जयेश बाफणा यांनी चक्क ३९९ हिरे आणि १८ कॅरेटचे सुमारे साडेसतरा ग्रॅम सोन्याचा वापर करीत आकर्षक पद्धतीची मौल्यवान राखी रक्षाबंधनाच्या औचित्यावर घडविली आहे. सध्या त्यांची हिरेजडीत राखी सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.
नाशिक : आपला व्यवसाय आणि त्यामधील कलात्मक प्रयोगाच्या आवडीपोटी शहरातील बाफणा डायमंड गॅलॅक्सीचे संचालक जयेश बाफणा यांनी चक्क ३९९ हिरे आणि १८ कॅरेटचे सुमारे साडेसतरा ग्रॅम सोन्याचा वापर करीत आकर्षक पद्धतीची मौल्यवान राखीरक्षाबंधनाच्या औचित्यावर घडविली आहे. सध्या त्यांची हिरेजडीत राखी सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. ‘रक्षाबंधन’ हा भाऊ-बहिणीच्या अतूट नात्यातील विश्वास अधिकाधिक वृद्धिंगत करणारा सण आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे. या पार्श्वभूमीवर अडीच लाख रुपये किमतीची आकर्षक कलाकुसर असलेली हिरेजडित राखी बाफणा यांनी तयार केली आहे. गेले २५ दिवस अथक परिश्रम घेऊन त्यांनी नावीन्यपूर्ण असा कलात्मक प्रयोग नाशिककरांपुढे सादर केला आहे. त्यांच्या दालनात येणाºया ग्राहकांना ही मौल्यवान राखी आकर्षित करत आहे. या राखीमध्ये हिºयांच्या वापरासोबतच एक सिंथेटिक प्रकाराचा हिरवा खडादेखील चपखलपणे वापरला गेला आहे. यामुळे राखीचे सौंदर्य आणि आकर्षण अधिकाधिक वाढले आहे.
या राखीची रचना अत्यंत साधी जरी ठेवली असली तरी ती अधिकाधिक आकर्षक व मनाला मोहिनी घालणारी आहे, असे बाफणा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. राखी बनविण्यासाठी मोठे आव्हान होते, ते म्हणजे तिच्या पारंपरिक लूकचे. मात्र हे आव्हान आम्ही सहज स्विकारले आणि अथक परिश्रम घेऊन मोठ्या कौशल्याने पारंपरिक मौल्यवान राखी घडविण्यास यश आल्याचे बाफणा म्हणाले. ही राखी तयार करताना मानवी हस्तकला आणि यांत्रिक वापराची सुरेख सांगड घालण्यात आली आहे. रक्षाबंधानाच्या पार्श्वभूमीवर जी बहीण आपल्या भावासाठी ही मौल्यवान राखी खरेदी करेल, तो भाऊ नक्कीच भाग्यवान ठरेल.