ऊसाच्या शेतात आढळले बिबट्याचे 3 बछडे

By Admin | Published: November 18, 2016 12:37 PM2016-11-18T12:37:45+5:302016-11-18T12:37:45+5:30

निफाड तालुक्यातील सायखेडाजवळ असलेल्या गोदानगर येथे शुक्रवारी सकाळी ऊस तोडणी करत असताना शेतक-यांना शेतात बिबट्याचे तीन बछडे आढळून आले.

3 calves of leopard found in sugarcane field | ऊसाच्या शेतात आढळले बिबट्याचे 3 बछडे

ऊसाच्या शेतात आढळले बिबट्याचे 3 बछडे

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 18 - निफाड तालुक्यातील सायखेडाजवळ असलेल्या गोदानगर येथे शुक्रवारी सकाळी ऊस तोडणी करत असताना शेतक-यांना शेतात बिबट्याचे तीन बछडे आढळून आले. 
 
शेतक-यांची बिबट्याचे बछडे आढळून आल्यानंतर वन विभागाला पाचारण केले. यानंतर वन विभागाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी दाखल होत या तिन्ही बछड्यांना ताब्यात घेतले. 
 
दरम्यान, गोदाकाठ पंचक्रोशीमध्ये नेहमीच बिबट्यांचा थरार पाहायला मिळतो. जंगलात मुक्तपणे वावरणा-या बिबट्यांचे लोकवस्तीमध्ये तसेच रस्त्यांवर दर्शन होण्याच्या घटनांमध्येही गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झाली आहे. 
 

Web Title: 3 calves of leopard found in sugarcane field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.