घोटी येथे ३ झोपडया आगीत भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 05:37 PM2021-04-28T17:37:22+5:302021-04-28T17:38:33+5:30
घोटी : येथील पश्चित्ररायनगर येथील तीन झोपडया मंगळवारी मध्य रात्री अडीचच्या सुमारास लागलेल्या आगीत भस्मसात झाल्यात. या आगीत सुमारे ५० हजाराचे नुकसान झाले असून या झोपड्यांमध्ये राहणारे ५ जण सुखरूप वाचले असून प्रसंगावधान राखल्याने कोंबड्या, संसारपयोगी वस्तू, रोख रक्कम व्यतिरिक्त कुठलीही जीवित हानी झाली नाही.
घोटी : येथील पश्चित्ररायनगर येथील तीन झोपडया मंगळवारी मध्य रात्री अडीचच्या सुमारास लागलेल्या आगीत भस्मसात झाल्यात. या आगीत सुमारे ५० हजाराचे नुकसान झाले असून या झोपड्यांमध्ये राहणारे ५ जण सुखरूप वाचले असून प्रसंगावधान राखल्याने कोंबड्या, संसारपयोगी वस्तू, रोख रक्कम व्यतिरिक्त कुठलीही जीवित हानी झाली नाही.
घोटी येथील पश्चित्ररायनगर भागात रेल्वे ट्रॅकच्या बाजूला कातकरी समाजाची ३ कुटुंबे वास्तव्याला आहेत. जगन बाबू हीलम, देवराम जगन हीलम, सावळीराम शंकर राऊत, रत्नाबाई सावळीराम राऊत, महादू सावळीराम राऊत, तनिशा सावळीराम राऊत असे ३ कुटुंब राहत होते.
तीन झोपड्यांमधील १ कुटुंब कामानिमित्त बाहेरगावी गेलेले असून उर्वरित २ कुटुंबातील सदस्य घरात झोपलेले असतांना मध्यरात्री २.३० वाजेदरम्यान घरातील रॉकेलच्या दिव्यामुळे आग लागली. त्याचवेळी शेजारील जनार्दन नवले यांनी प्रसंगावधान राखत आग आरडाओरड केली व कुटुंबातील सर्वांना उठवले व त्वरित घराबाहेर काढल्याने ५ जणांचे प्राण वाचले. झोपडीत २० कोंबड्या, रोख रक्कम, मासेमारी करिता लागणारे साहित्य, महत्वाची कागदपत्रे, संसारपयोगी साहित्य, कपडे आदी सर्वच्या सर्व काहीवेळातच बेचिराख झाले.
या अचानक लागलेल्या आगीत जवळपास ५० हजाराहून अधिक रकमेच्या वस्तूंचे नुकसान झाले आहे.
मध्यरात्री लागलेली आग वाऱ्यामुळे फैलावली व घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या.
या आगीचे लोणमहामार्गावरील टोल नाक्यावरून आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात दिसत होते.
ही आग लागल्याचे समजताच समाधान गोईकने, निलेश भोर यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत आजूबाजूच्या घरातून पाणी घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र झोपडीतील सर्व वस्तू त्यापूर्वीच आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.
हातावरचे काम व मजुरी करून पोट भरत असलेल्या या कुटुंबाचा संपूर्ण संसार उघड्यावर पडला. लोकडाऊन मुळे सर्व धंदे ठप्प झालेले, त्यात उर्वरित संसार जळून खाक झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यानंतर सकाळी घोटी ग्रामपालिकेचे सरपंच रामदास भोर, विकास जाधव, प्रशांत रुपवते, सदस्य संजय आरोटे, श्रीकांत काळे, हिरामण कडू ग्रामविकास अधिकारी रवींद्र धुंदाळे यांनी घटनास्थळी जाऊन आगीचा पहाणी केली.
नुकसानग्रस्त कुटुंबांना पुन्हा उभे राहण्यासाठी संसारपयोगी वस्तू व किराणा देणार असल्याचे सरपंच भोर यांनी सांगितले. घोटी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी देखिल सदर कुटुंबाचे सांत्वन केले व चौकशीचे आदेश दिले. पुढील तपास शरद कोठुळे, शीतल गायकवाड हे करीत आहेत.
नशीब बलवत्तर म्हणून...
मध्यरात्री साखरझोपेत असतांना शेजारील जनार्दन नवले हे बाहेर झोपलेले असल्याने यांना जळण्याचा वास आल्याने व आग लागल्याचे दिसताच त्यांनी आरडाओरड करीत संपूर्ण कुटुंब घराबाहेर काढल्याने जीवित हानी टळली. (२८ घोटी १, २)