सिन्नर-शिर्डी मार्गावर तिहेरी अपघातात २५ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 11:49 PM2020-02-07T23:49:34+5:302020-02-08T00:14:05+5:30

सिन्नर : सिन्नर - शिर्डी महामार्गावर वावीजवळील मिरगाव फाटा येथे खासगी आराम बस, हायवा डंपर व ह्युंडाई क्रेटा यांच्यात तिहेरी अपघात होऊन २५ जण जखमी झाले. दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात तीन जण गंभीर जखमी असून, त्यांना अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे.

3 injured in triple accident on Sinnar-Shirdi route | सिन्नर-शिर्डी मार्गावर तिहेरी अपघातात २५ जखमी

सिन्नर-शिर्डी मार्गावर तिहेरी अपघातात २५ जखमी

Next
ठळक मुद्देतीन गंभीर : आराम बसमधील प्रवाशांवर उपचार सुरू

सिन्नर : सिन्नर - शिर्डी महामार्गावर वावीजवळील मिरगाव फाटा येथे खासगी आराम बस, हायवा डंपर व ह्युंडाई क्रेटा यांच्यात तिहेरी अपघात होऊन २५ जण जखमी झाले. दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात तीन जण गंभीर जखमी असून, त्यांना अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे.
खासगी आराम बस रस्त्यावर पूर्णपणे आडवी झाल्याने महामार्गावरील वाहतूक सुमारे एक तास ठप्प झाली होती. अन्सारी कंपनीची ट्रॅव्हल (एमएच-०४, जेयू २१७७) शिर्डीकडे जात होती. मिरगाव फाटा येथे समृद्धी महामार्गाच्या कामासाठी मुरूम वाहणारा खासगी हायवा (एमएच १७, बीव्ही-११७२) महामार्ग ओलांडत असताना अन्सारी कंपनीच्या ट्रॅव्हल्सला धडक दिली. त्यानंतर ताबा सुटल्याने या ट्रॅव्हलने समोरून येणाऱ्या क्रेटाला (एमएच-१७, बीव्ही-४५९५) धडक दिली. त्यात क्रेटाचा चक्काचूर झाल्याने एक तास महामार्ग बंद होता.
ट्रॅव्हल्सला डंपरने धडक दिल्याने ती क्रेटा गाडीवर उलटली; परंतु वेळीच क्रेटा कारच्या एअर बॅग उघडल्याने चालक रवींद्र गोंदकर बचावले. हवालदार प्रकाश गवळी, नितीन जगताप, सूर्यवाड, उगले यांनी मदतकार्य राबविले. सर्व जखमी खासगी आराम बसमधील प्रवासी आहेत. ते ग्रॅण्डरोड, बोरीवली येथील रहिवासी असून, शिर्डी येथे दर्शनासाठी जात होते. जखमींना शिर्डी, सिन्नर, नाशिक अशा विविध ठिकाणच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातातील जखमी
आर्य राहुल बेर्डे (१३), सार्थक देवेंद्र चोरगे (१२), मनीषा चेतन पवार (४२), पूजा राजेंद्र चोरगे (३३), राहुल चंद्रशेखर बेर्डे (४५), देवेंद्र देवीदास चोरगे (३७), श्वेतांबरी चंद्रशेखर बेर्डे (६७), अमृता सचिन चोरगे (४०), पूजा बेर्डे (३१), शोभा चोरगे, बंदीश पवार, चेतन पवार, बनीत पवार (सर्व रा. बोरिवली) हे जखमी झाले. तर शिवांश चोरगे, देवीदास बेर्डे, अमीर बेर्डे या गंभीर जखमींना नाशिक येथील खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वावी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचत मदतकार्य सुरू केले. वावी पोलिसांसह महामार्ग पोलीस, दरोडाग्रस्त पथकाचे वाहनही घटनास्थळी दाखल होत त्यांनी वाहतूक सुरळीत केली. तब्बल एक तासानंतर महामार्ग सुरळीत झाला. स्थानिक नागरिकही मदतीसाठी धावून आले. जखमींना पाच ते सहा रु ग्णवाहिकेतून सिन्नरच्या खासगी रु ग्णालयात दाखल केले.

Web Title: 3 injured in triple accident on Sinnar-Shirdi route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात