नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत ३ लाख ८० हजार १७४ रुग्ण कोरोनामुक्त ; ४ हजार ५९३ रुग्णांवर उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 05:10 PM2021-06-12T17:10:27+5:302021-06-12T17:14:37+5:30

नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत शनिवारी (दि.१२) सकाळी  प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८० हजार १७४ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४ हजार ५९३  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच  उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये २१६ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ५ हजार ५८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे,

3 lakh 80 thousand 174 patients in Nashik district till date free of corona; 4 thousand 593 patients are undergoing treatment | नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत ३ लाख ८० हजार १७४ रुग्ण कोरोनामुक्त ; ४ हजार ५९३ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत ३ लाख ८० हजार १७४ रुग्ण कोरोनामुक्त ; ४ हजार ५९३ रुग्णांवर उपचार सुरू

Next
ठळक मुद्दे जिल्ह्यात ३ लाख ८० हजार १७४ रुग्ण कोरोनामुक्तजिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये २१६ ने घटसध्यस्थिीत ४ हजार ५९३ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत शनिवारी (दि.१२) सकाळी  प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८० हजार १७४ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४ हजार ५९३  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच  उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये २१६ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ५ हजार ५८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा  नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
नाशिक जिल्ह्यातील  ग्रामीण भागामध्ये सध्या नाशिक ३०१,  बागलाण १६३, चांदवड २६४, देवळा ५९, दिंडोरी २६४, इगतपुरी ३४, कळवण ९०, मालेगाव १५६, नांदगाव १२९, निफाड ४२६, पेठ ०८, सिन्नर ६४१, सुरगाणा १५, त्र्यंबकेश्वर ००, येवला ६८ असे एकूण २ हजार ६१८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ८३९ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १३५ तर जिल्ह्याबाहेरील ०१  रुग्ण असून असे एकूण ४  हजार ५९३  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ९० हजार ३५४ रुग्ण आढळून आले आहेत. तर जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९६.४४ टक्के, नाशिक शहरात ९८.०७ टक्के, मालेगाव मध्ये ९६.३० टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.७७  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.३९ इतके आहे.  दरम्यान,  नाशिक ग्रामीण २ हजार ६४०  नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून २ हजार ५०३ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३२६  व जिल्हा बाहेरील ११८ अशा एकूण ५ हजार ५८७  रुग्णांचा मृत्यु झाला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील ३ लाख  ९०  हजार ३५४ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३ लाख ८० हजार १७४  रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले केवळ ४  हजार ५९३ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.तर  जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७. ३९ टक्के.

Web Title: 3 lakh 80 thousand 174 patients in Nashik district till date free of corona; 4 thousand 593 patients are undergoing treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.