जनलक्ष्मी बॅँकेतुन ३ लाख ९२ हजार लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 07:13 PM2018-08-09T19:13:53+5:302018-08-09T19:14:12+5:30

मालेगाव : येथील सटाणारोडवरील जनलक्ष्मी बॅँकेच्या कॅश काऊंटर कॅबिनमधुन भरदिवसा दोन अज्ञात चोरट्यांनी ३ लाख ९२ हजारांची रोकड चोरुन नेली.

3 lakh 92 thousand lamps from Janalakshmi bank | जनलक्ष्मी बॅँकेतुन ३ लाख ९२ हजार लंपास

जनलक्ष्मी बॅँकेतुन ३ लाख ९२ हजार लंपास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : येथील सटाणारोडवरील जनलक्ष्मी बॅँकेच्या कॅश काऊंटर कॅबिनमधुन भरदिवसा दोन अज्ञात चोरट्यांनी ३ लाख ९२ हजारांची रोकड चोरुन नेली. सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बॅँकेचे व्यवस्थापक किरण परशराम वाघ यांनी छावणी पोलीसात फिर्याद दिली. सोमवारी बॅँकेच्या कॅश क्लोझींगच्या वेळी भरण्यात रक्कम कमी आल्याने मुख्य शाखेचे प्रशासन अधिकारी यांनी सीसीटीव्हीचे फुटेज पाहून चोरी झाल्याची खात्री झाल्याने बुधवारी रात्री त्यांनी पोलीसात फिर्याद दिली. दोन अनोळखी चोरट्यांपैकी एकाने टोपी घातली असून त्यांनी ही रक्कम चोरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.

Web Title: 3 lakh 92 thousand lamps from Janalakshmi bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा