जिल्ह्यात दिवसभरात ८४ मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 01:54 AM2019-08-13T01:54:51+5:302019-08-13T01:56:24+5:30

नाशिक : जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने सोमवारी काहीशी विश्रांती घेतली असून, दिवसभरात केवळ ८४ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील काही तालुकेवगळता सर्वदूर झालेल्या पावसामुळे धरणांची पातळी वाढली असल्याने धरणे तृप्त झाली असली तरी हवामान विभागाने पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

3 mm of rainfall during the day in the district | जिल्ह्यात दिवसभरात ८४ मिमी पाऊस

जिल्ह्यात दिवसभरात ८४ मिमी पाऊस

Next
ठळक मुद्देअतिवृष्टीचाही इशारा : इगतपुरी, त्र्यंबकला रिमझिम

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने सोमवारी काहीशी विश्रांती घेतली असून, दिवसभरात केवळ ८४ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील काही तालुकेवगळता सर्वदूर झालेल्या पावसामुळे धरणांची पातळी वाढली असल्याने धरणे तृप्त झाली असली तरी हवामान विभागाने पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सर्वत्र पावसाचा जोर कमी झाला असून, पावसाचे क्षेत्र असलेल्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातही सोमवारी पावसाचे प्रमाण कमी राहिले. या हंगामात दरररोज साधारपणे ३०० ते ५०० मि.मी. होणारा पाऊस गेल्या सोमवारी १९०० मि.मी.पर्यंत कोसळला होता. सोमवारी रोजी मात्र अवघा ८४ मि.मी. इतकी पावसाची नोंद झाली.
(पान ७ वर)

अन्य तालुक्यांमध्येदेखील पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर वगळता अन्य तालुक्यांमध्ये कमी पाऊस झाल्याची नोंद आहे.
इगतपुरीत २२, तर त्र्यंबकेश्वरमध्ये २७ मि.मी. पाऊस झाला. ज्या ठिकाणी अन्य तालुक्यांनी हजार मि.मी.च्या पुढे पावसाची सरासरी गाठली आहे तेथे या पाच तालुक्यांत तुलनेने कमी पाऊस असल्याने येथील शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. दरम्यान, पावसाने विश्रांती घेतल्यामुळे धरणांमधील विसर्गदेखील कमी करण्यात आला असल्याने पुराची पातळी कमी झालेली आहे. पाच तालुके कोरडे
पाच तालुक्यांमध्ये तर सोमवारी पावसाचा थेंबही पडला नाही. मालेगाव, नांदगाव, येवला, देवळा आणि सिन्नर या तालुक्यांमध्ये अन्य तालुक्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. नांदगावला केवळ २०० मि.मी. पाऊस झाला आहे, तर मालेगावला ३९१ मि.मी. पाऊस होऊ शकला. देवळ्यात २८१, येवल्यात ४२४ मि.मी. पाऊस झालेला आहे.

Web Title: 3 mm of rainfall during the day in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस