येवल्यातील ३ अहवाल पॉझीटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 06:51 PM2020-08-25T18:51:35+5:302020-08-25T18:51:58+5:30
येवला : तालुक्यातील ३ संशयितांचे कोरोना अहवाल मंगळवारी, (दि. २५) पॉझीटीव्ह आले आहेत. तर नासिक येथील खाजगी रूग्णालयात शहरातील ५३ वर्षीय बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
लोकमत न्युज नेटवर्क
येवला : तालुक्यातील ३ संशयितांचे कोरोना अहवाल मंगळवारी, (दि. २५) पॉझीटीव्ह आले आहेत. तर नासिक येथील खाजगी रूग्णालयात शहरातील ५३ वर्षीय बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
बाधितांमध्ये सायगाव येथील ४८ वर्षीय पुरूष, अनकाई येथील ३६ वर्षीय महिला तर नगरसुल स्टेशन येथील ६१ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. हे तीनही अहवाल खाजगी लॅबकडील आहेत. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ३१६ झाली असून आजपर्यंत २४५ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर आत्तापर्यंत २५ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला बाधित (अॅक्टीव्ह) रूग्ण संख्या ४६ असल्याची माहिती तालुका आरोग्य डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली.
बाधितांपैकी बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षात १२, होम कोरंटाईन ६, नगरसुल येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये २१, नाशिक जिल्हा रूग्णालयात एक तर नाशिक येथील खाजगी रूग्णालयात ६ बाधित रूग्णांवर औषधोपचार सुरू आहेत.