तीन टक्के मुद्रांक शुल्क सवलतीचे उरले १५ दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:30 AM2020-12-16T04:30:56+5:302020-12-16T04:30:56+5:30

नाशिक : राज्य शासनाने ३१ डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्कामध्ये तीन टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला असून, ही मुदत संपायला ...

3% stamp duty concession left for 15 days | तीन टक्के मुद्रांक शुल्क सवलतीचे उरले १५ दिवस

तीन टक्के मुद्रांक शुल्क सवलतीचे उरले १५ दिवस

Next

नाशिक : राज्य शासनाने ३१ डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्कामध्ये तीन टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला असून, ही मुदत संपायला अवघा पंधरवडा उरला आहे. त्यामुळे नाेंदणी कार्यालयांमध्ये गर्दी वाढू लागली आहे; मात्र आता याच महिन्यात, म्हणजे ३१ डिसेंबरपूर्वी नाेंदणी शुल्क आगाऊ भरून पुढील चार महिन्यांत दस्तनाेंदणी प्रक्रिया पूर्ण करीत सध्या सुरू असलेल्या तीन टक्के मुद्रांक शुल्कातील सवलतीचा लाभ घेता येणार आहे.

सध्या मुद्रांक शु्ल्कातील सवलतीचा लाभ घेण्यासाठी दस्त नाेंदणीचे प्रमाण वाढले असून, मुद्रांक शुल्क सवलतीचा फायदा सर्वसामान्य जनतेला घेता यावा, यासाठी राज्यातील काही शहरात विशिष्ट दुय्यम निबंधक कार्यालये रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने यापूर्वीच घेतला असून, नाशिकमध्येही काही कार्यालये रात्री ८ पर्यंत सुरू राहणार आहेत. रज्य सरकारने मुद्रांक शुल्कात कपात केल्यानंतर घर खरेदीला चालना मिळाली असून, नाशिक जिल्ह्यात ग्राहकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर या तिमाहीमध्ये ३७ हजार ४२२ दस्त नोंदणीच्या माध्यमातून शासनाला १७७ कोटी ५५ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी यामधून राज्याला मिळणाऱ्या महसुलात लॉकडाऊनमुळे एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत तब्बल ६,८३८.७९ कोटी रुपयांचा फटका बसल्यानंतर बांधकाम व्यवसायाला गती देण्यासाठी डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्कामध्ये ३ टक्के, तर जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांसाठी २ टक्के सूट देण्याचा निर्णय महसूल विभागाने ऑगस्टमध्ये घेतला होता. त्यानुसार ग्राहकांना ३१ डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्कातील तीन टक्के कपातीचा लाभ घेता येणार आहे.

कोट-१

शसनाने ३१ डिसेंबर २०२० पर्यंत दस्त नोंदणी केल्यास ३ टक्के मुद्रांक शुल्कात सवलत घोषित केलेली आहे. या सवलतीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, यासाठी नाशिक जिल्ह्यातील सहदुय्यम निबंधक श्रेणी १ व २ ची कार्यालय नाशिक क्रमांक १ ते ७, सह दुय्यम निबंधक वर्ग-२ मालेगाव क्रमांक १, सहदुय्यम निबंधक मालेगाव क्रमांक ३, दुय्यम निबंधक श्रेणी-१, सिन्नर क्रमांक २, दुय्यम निबंधक श्रेणी-१, निफाड, दुय्यम निबंधक श्रेणी- १, दिंडोरी व दुय्यम निबंधक श्रेणी-१, दुय्यम निबंधक श्रेणी-१, इगतपुरी दुय्यम निबंधक श्रेणी- १, येवला या कार्यालयामध्ये दर शनिवारी कामकाज सुरू असून, ही कार्यालये सायंकाळी ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. - कैलास दवंगे, मुद्रांक जिल्हाधिकारी नाशिक

इन्फो-

मुद्रांक शुल्क कपातीनंतर दस्त नोंदणी

महिना -दस्तनोंद - महसूल ( रुपयांमध्ये )

सप्टेंबर -११,४७२ - ५३ कोटी ६५ लाख

ऑक्टोबर - १३,३७२ - ६८ कोटी २१ लाख

नोव्हेंबर - १२,५७८ - ५५ कोटी ७० लाख

कोट- १

मुद्रांक शुल्कातील सवलतीचा लाभ घेण्यासाठी अजूनही ग्राहकांकडे १५ दिवसांचा अवधी आहे. त्यामुळे घर घेण्याच्या तयारीत असलेल्या ग्राहकांनी निर्णय घेऊन मुद्रांक शुल्क भरले. तर पुढील १२० दिवसांत त्यांना दस्त नोंदणीची प्रक्रिया करता येऊ शकेल. मुद्रांक शुल्कातील तीन टक्के सवलतीने बांधकाम व्यावसायात उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे.

-नरेश कारडा, चेअरमन, कारडा कन्स्ट्रक्शन्स

कोट -२

मुद्रांक शुल्कातील सवलतीचा फायदा थेट ग्राहकाला मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात घरांच्या बुकींगला प्रतिसाद मिळत असून, बांधकाम व्यावसायात

तेडीचे

वातावरण निर्माण झाले आहे. घर घेण्यास इच्छुक ग्राहकांच्या हातात अजूनही मुद्रांक शुल्कातील सवलतीचा लाभ घेण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी आहे. त्यामुळे या कालावधीत घर खरेदीचे व्यवहार निश्चितच वाढणार आहेत.

-निखिल रुंगटा, संचालक रुंगटा ग्रुप.

कोट-३

मुद्रांक शुल्कातील सवलतीचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांचा घर खरेदीसाठी ओघ वाढला आहे. त्यामुळेच उपनिबंधक कार्यालयांचा वेळ वाढविण्यात आला असून, सर्वच कार्यालयांमध्ये दस्तनोंदणी व मुद्रांक शुल्क जमा करण्यासाठी गर्दी आहे. त्याचप्रमाणे नवीन घर बूक करून त्याची नोंदणी व मुद्रांक शुल्क भरण्याची तयारी अनेक ग्राहक करीत आहेत.

-रवि महाजन, अध्यक्ष मेट्रो नाशिक

(

Web Title: 3% stamp duty concession left for 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.