मुंढेगावात पुन्हा ३ विद्यार्थी, २ कर्मचारी बाधित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 01:45 AM2021-12-23T01:45:46+5:302021-12-23T01:46:04+5:30
जिल्ह्यात महिन्याच्या पूर्वार्धात आदिवासी विभागाच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावच्या इंग्रजी निवासी शाळेतील १५ विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यानंतर पुन्हा ३ विद्यार्थी आणि २ कर्मचारी बाधित झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, बुधवारी जिल्ह्यात ४८ रुग्ण बाधित आढळून आले असून ३० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत
नाशिक : जिल्ह्यात महिन्याच्या पूर्वार्धात आदिवासी विभागाच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावच्या इंग्रजी निवासी शाळेतील १५ विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यानंतर पुन्हा ३ विद्यार्थी आणि २ कर्मचारी बाधित झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, बुधवारी जिल्ह्यात ४८ रुग्ण बाधित आढळून आले असून ३० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यात बुधवारी पुन्हा कोरोनामुक्तांपेक्षा कोरोनाबाधित अधिक आढळून आल्याने एकूण कोरोना उपचारार्थींची संख्या ४७८ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक ग्रामीणला २३७, नाशिक मनपाला २२९, मालेगाव मनपात ६, तर जिल्हाबाह्य ६ रुग्णांचा समावेश आहे. तसेच १९२२ रुग्णांचे कोरोनाचे अहवाल प्रलंबित आहेत. त्यात १६९३ नाशिक ग्रामीणचे, १४९ नाशिक मनपाचे, ८० मालेगाव मनपाचे अहवाल प्रलंबित आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनामुक्ततेचे प्रमाण ९७.७७ टक्के असून सर्वाधिक कोरोनामुक्ततेचे प्रमाण ९८.१७ टक्के नाशिक मनपा क्षेत्रात आहे.
इन्फो
केवळ ३ तालुक्यांतच आढळले बाधित
जिल्ह्यात केवळ निफाड, इगतपुरी आणि कळवण या ३ तालुक्यांत मिळून ९ बाधित आढळून आले असून उर्वरित सर्व ३९ बाधित हे नाशिक मनपा क्षेत्रातील आहेत. जिल्ह्यात बुधवारी पुन्हा एकदा शून्य मृत्यूची नोंद झाल्याने आरोग्य विभागाला काहीसा दिलासा मिळाला आहे.