जिल्ह्यातील ३ शिक्षकांना ‘टीचर इनोव्हेशन अवॉर्ड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 05:48 PM2018-09-26T17:48:57+5:302018-09-26T17:55:14+5:30
इगतपुरी : रवि जे मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन, भारतीय प्रबंध संस्था (आयआयएम) अहमदाबाद व स्टेट इनोव्हेशन एॅण्ड रिसर्च फाऊंडेशन (सर फाऊंडेशन), सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, देण्यात येणारा ‘टीचर इनोव्हेशन अवॉर्ड २०१८’ नाशिक जिल्ह्यातील ३ शिक्षकांना जाहीर झाला असून, त्यामध्ये राज्यातील ५३ शिक्षकांचा समावेश आहे.

पुरस्कारार्थीमध्ये प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती व शिक्षण विस्तार अधिकारी यांचा समावेश आहे. शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार ‘एज्युकेशन इनोव्हेशन बँक’ या प्रकल्पांतर्गत हे अवॉर्ड जाहीर करण्यात आले आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर ही निवड केली जाते.
राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्या ५४ शिक्षकांमध्ये नाशिक जिल्ह्यातील कनाशी ता. कळवण येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेचे माध्यमिक शिक्षक मधुकर घायदार, आसखेडा ता. बागलाण येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे माध्यमिक शिक्षक जयवंत ठाकरे आणि पांढरी वस्ती ता. चांदवड येथील जि. प. शाळेच्या प्राथमिक शिक्षक वैशाली सूर्यवंशी यांचा समावेश आहे. या पुरस्कारांचे वितरण दि. ६ व ७ आॅक्टोबर रोजी सोलापूर येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ‘इनोव्हेटिव्ह प्रॅक्टीसेस इन स्कूल एज्युकेशन कॉन्फरन्स’ मध्ये होणार आहे. यावेळी शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून राष्ट्रीय स्तरावरील या कॉन्फरन्स’मध्ये विविध विषयावर शैक्षणिक मंथन होणार आहे.