आरटीई अंतर्गत ३ हजार प्रवेश निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 11:44 PM2020-08-24T23:44:19+5:302020-08-25T01:20:20+5:30
नाशिक : जिल्ह्णात आरटीई अंतर्गत आतापर्यंत ३ हजार प्रवेश निश्चित झाले आहेत. शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत नाशिक जिल्ह्यातील ४४७ शाळांत आरटीईसाठी ५ हजार ५५७ जागा आहेत. त्यासाठी पैकी एकूण १७ हजार ६३० अर्ज प्राप्त झाले होते. यातील सध्या ५ हजार ३०७ विद्यार्थ्यांची निवड झाली असून यातील ३ हजार ४७ प्रवेश निश्चित झाले आहेत.तर २ हजार ७३७ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

आरटीई प्रवेश प्रक्रिया सन २०२०-२०२१ करिता ज्या आॅनलाईन अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची लॉटरीद्वारे निवड करण्यात आली असून प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी ३१ आॅगस्ट पर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा, अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाने केल्या आहेत.
लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांना प्रवेशाची प्रक्रिया व वेळ संबंधित शाळेकडून फोन किवा (एसएमएस ) द्वारे कळविला जात असला तरी पालकांनी केवळ मेसेजवर अवलंबून राहू नये. आरटीई पोर्टलवर ‘प्रवेशाची तारीख’ या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याचा दिनांक पाहावा. शाळेत प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये. तसेच प्रवेश घेण्यासाठी जाताना बालकांना आपल्या बरोबर नेऊ नये. निवड यादीतील बालकांच्या पालकांना लॉकडाऊन मुळे/बाहेरगावी असल्याने /किंवा अन्य कारणामुळे शाळेत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणेशक्य नसेल तर त्यांनी शाळेशी संपर्क करावा. तसेच आणि व्हाटस्अॅप, इ-मेल/किंवा अन्य माध्यमाद्वारे बालकाच्या प्रवेशाची आवश्यक कागदपत्रे सादर करावी.त्यातून पाल्याचा शाळेतील तातपुरता प्रवेश निश्चित करावा. दरम्यान, शाळेच्या प्रवेशद्वारावर प्रवेशाचे वेळापत्रक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रवेश प्रक्रियेनंतर पोर्टलवरच सूचना पालकांनी मुलांच्या शाळेत प्रवेशाकरिता मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती, आरटीई पोर्टलवरील हमीपत्र आणि अर्जाची स्थिती यावर क्लिक करून हमीपत्र आणि आॅलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून शाळेत घेऊन जावे. परंतू, प्रतीक्षा यादीमधील पालकांनी बालकांच्या प्रवेशाकरिता सध्या शाळेत जाऊ नये. त्यांच्या करिता मुळ निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्वतंत्र सूचना आरटीई पोर्टलवर दिल्या जाणार आहेत.