जिल्ह्यात ११ महिला उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 12:55 AM2019-10-10T00:55:05+5:302019-10-10T00:55:54+5:30

नाशिक : जिल्ह्यातील आजवर नऊ महिला उमेदवारांनी विधानसभा गाठलेली आहे. त्यातील पुष्पाताई हिरे यांनी दाभाडी मतदारसंघातून चारवेळा बाजी मारलेली आहे. यंदाही निवडणुकीत ११ महिला उमेदवार नशीब आजमावित असून, मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा महिला उमेदवारांची संख्या घटली आहे. हे प्रमाण अवघे सात टक्के इतके आहे. २०१४ च्या निवडणुकीत १५ महिला उमेदवार रिंगणात होत्या.

3 women candidates in the district | जिल्ह्यात ११ महिला उमेदवार

जिल्ह्यात ११ महिला उमेदवार

Next
ठळक मुद्दे संख्या घटली : आजवर नऊ महिलांनी गाठली विधानसभा

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यातील आजवर नऊ महिला उमेदवारांनी विधानसभा गाठलेली आहे. त्यातील पुष्पाताई हिरे यांनी दाभाडी मतदारसंघातून चारवेळा बाजी मारलेली आहे. यंदाही निवडणुकीत ११ महिला उमेदवार नशीब आजमावित असून, मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा महिला उमेदवारांची संख्या घटली आहे. हे प्रमाण अवघे सात टक्के इतके आहे. २०१४ च्या निवडणुकीत १५ महिला उमेदवार रिंगणात होत्या.
राजकारणात महिलाही पुरुषांच्या बरोबरीने सहभाग नोंदवित आलेल्या आहेत. काही महिलांनी तर सत्तेत महत्त्वाची खाती सांभाळत आपल्या कार्यक्षमतेची चुणूक दाखवून दिलेली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत १५ महिला उमेदवार रिंगणात होत्या. त्यात बागलाण मतदारसंघात सर्वाधिक सहा उमेदवारांचा समावेश होता. या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांनी पाच महिला उमेदवारांना संधी दिली होती. त्यापैकी बागलाणमधून दीपिका चव्हाण, नाशिक मध्यमधून प्रा. देवयानी फरांदे, नाशिक पश्चिममधून सीमा हिरे आणि इगतपुरीतून निर्मला गावित यांनी विजयश्री प्राप्त केली होती.
२०१४ मध्ये मोदी लाटेतही कॉँग्रेस-राष्टÑवादीने प्रत्येकी एक जागा जिंकली होती. आता विधानसभा निवडणुकीत ११ महिला उमेदवार रिंगणात आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत महिला उमेदवारांची संख्या घटली आहे.
यंदा इगतपुरीतून शिवसेनेकडून निर्मला गावित, अपक्ष शैला झोले, बागलाणमधून राष्टÑवादीकडून दीपिका चव्हाण आणि अपक्ष अंजनाबाई मोरे, नाशिक पूर्वमधून अपक्ष भारती मोगल, नाशिक मध्यमधून भाजपच्या देवयानी फरांदे आणि कॉँग्रेस आघाडीच्या डॉ. हेमलता पाटील, नाशिक पश्चिममधून भाजपच्या सीमा हिरे व बहुजन विकास आघाडीच्या मनीषा साळुंखे, देवळालीतून राष्टÑवादीच्या सरोज अहिरे, तर मालेगाव मध्यमधून भाजपच्या दीपाली वारुळे या उमेदवारी करीत आहेत.
निफाड, दिंडोरी, कळवण-सुरगाणा, चांदवड, मालेगाव बाह्य, येवला आणि नांदगाव या मतदारसंघांत एकही महिला उमेदवार नाही. मागील निवडणुकीत निवडून गेलेल्या चारही महिला आमदार यंदा पुनश्च नशीब आजमावत आहेत. जिल्ह्यातील विजयी महिला उमेदवार वर्ष मतदारसंघ उमेदवार
१९६७ सिन्नर रुक्मिणी वाजे
१९७२ मालेगाव आयेशा हकीम
१९८५ दाभाडी पुष्पाताई हिरे
१९९० दाभाडी पुष्पाताई हिरे
१९९५ दाभाडी पुष्पाताई हिरे
१९९९ निफाड मंदाकिनी कदम
१९९९ दाभाडी पुष्पाताई हिरे
२००४ नाशिक डॉ. शोभा बच्छाव
२००९ इगतपुरी निर्मला गावित
२०१४ बागलाण दीपिका चव्हाण
२०१४ नाशिक मध्य देवयानी फरांदे
२०१४ नाशिक पश्चिम सीमा हिरे
२०१४ इगतपुरी निर्मला गावित

Web Title: 3 women candidates in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.