जिल्ह्णात ३० शेतकऱ्यांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 01:39 AM2018-05-03T01:39:13+5:302018-05-03T01:39:13+5:30
नाशिक : जिल्ह्णात शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम असून, १ मे महाराष्ट्र दिनी देवळा तालुक्यातील खालप येथील कृष्णा भीमा सूर्यवंशी या तरुण शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जिल्ह्णात कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आजवर ३० शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत.

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कायम असून, दरमहा साधारणत: सहा शेतकरी विविध मार्गांनी जीवनयात्रा संपवित आहेत. दोन दिवसांपूर्वी इगतपुरी तालुक्यातील उभाडे येथील लुखा नामदेव भोर (४५) या शेतकºयाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमागील कारणाचा शोध घेतला जात असतानाच मंगळवारी महाराष्टÑदिनी कृष्णा सूर्यवंशी या ३५ वर्षीय तरुण शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेत शेतकºयांचे दीड लाखांचे कर्ज माफ केले असतानाही आत्महत्येचे सत्र थांबत नसल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.