बनावट कागदपत्रांद्वारे तीस लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 07:23 PM2017-07-23T19:23:29+5:302017-07-23T19:23:29+5:30

तोतया जमीन मालक ; सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

30 lakh cheating through fake documents | बनावट कागदपत्रांद्वारे तीस लाखांची फसवणूक

बनावट कागदपत्रांद्वारे तीस लाखांची फसवणूक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मूळ मालकाऐवजी तोतया जमीन मालक उभा करून जमिनीची व्रिकी बनावट कागदपत्रांद्वारे करून एकाची तीस लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी तिघा संशयितांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
शैलेश बाबूराव मारू (४३, रा़मेरी, दिंडोरी रोड) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित सुयोग राजेंद्र सलादे (रा़ सारस अपार्टमेंट, पाटील लेन नंबर ४, कॉलेजरोड, नाशिक), भरत बोरीचा (रा़ देवयानी सोसायटी, काठेगल्ली द्वारका) व तोतया सुशील रामकृष्ण पुण्यार्थी यांनी १० जानेवारी २०१३ ते २३ जुलै २०१५ या कालावधीत दुय्यम निबंधक कार्यालय नाशिक येथे जमिनी विक्रीच्या व्यवहारात फसवणूक केली़ संशयितांनी तोतया व्यक्ती रामकृष्ण पुण्यार्थी हा जमिनीचा मालक असल्याचे दाखवून बनावट कागदपत्रे तयार केली़ यानंतर मारू यांच्याकडून या जमिनीच्या व्यवहारासाठी २७ लाख ९७ हजार ५०० रुपये, मुद्रांक शुल्कापोटी ४६ हजार ८०० रुपये, तर इतर खर्चापोटी ६० हजार रुपये घेतले़
या तिघाही संशयितांनी जमिनीचा व्यवहार पूर्ण होऊन मारू हे मालक झाल्याचे भासविले़; मात्र या जमिनीचा प्रत्यक्ष ताबा न मिळाल्याने मारू यांना संशय आला व त्यांनी या जमिनीच्या कागदपत्रांची तसेच मालगाची चौकशी केल्यानंतर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले़ या प्रकरणी त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे गाठून तिघा संशयितांविरोधात फिर्याद दिली़

Web Title: 30 lakh cheating through fake documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.