महापालिकेच्या तिजोरीत एका दिवसात ३० लाखांचा महसूल जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2022 01:10 AM2022-03-21T01:10:29+5:302022-03-21T01:11:25+5:30

महापालिकेच्या पूर्व विभागीय कार्यालयाच्या वतीने एका दिवसात २९ लाख १९ हजार रुपये घरपट्टी थकबाकी मिळकतधारकांकडून आणि १ लाख ७१ हजार रुपये थकबाकी मिळकतधारकांची पाणीपट्टी वसूल करण्यात आली आहे

30 lakh revenue collected in one day in NMC treasury | महापालिकेच्या तिजोरीत एका दिवसात ३० लाखांचा महसूल जमा

महापालिकेच्या तिजोरीत एका दिवसात ३० लाखांचा महसूल जमा

Next

इंदिरानगर : महापालिकेच्या पूर्व विभागीय कार्यालयाच्या वतीने एका दिवसात २९ लाख १९ हजार रुपये घरपट्टी थकबाकी मिळकतधारकांकडून आणि १ लाख ७१ हजार रुपये थकबाकी मिळकतधारकांची पाणीपट्टी वसूल करण्यात आली आहे; तसेच ६८ थकबाकीदारांचे नळ जोडण्यात आले आहेत. महापालिकेच्या पूर्व विभागात घरपट्टीचे ८७ हजार ४५८ मिळकतधारक आहेत; तसेच २९ हजार ७०६ नळजोडण्या आहेत. त्यात निवासी नळजोडण्या २८ हजार २०६, व्यावसायिक नळजोडण्या १०६४ व अनिवासी नळजोडण्या ४३६ अशी संख्या आहे. महापालिका प्रशासक कैलास जाधव व उपायुक्त अर्चना तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (दि. १८) विभागीय अधिकारी स्वप्निल मुधलवाडकर यांनी थकबाकीदारांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार २९ लाख १९ हजार रुपये थकबाकी घरपट्टी मिळकतधारकांकडून आणि १ लाख ७१ रुपये थकबाकी नळपट्टी मिळकतधारकांकडून वसूल करण्यात आली आहे; तसेच ६८ नळपट्टी थकबाकी मिळकतधारकांची नळजोडणी तात्पुरत्या स्वरूपात तोडण्यात आली आहे. दहा हजार रुपयांच्या वर नळपट्टी थकबाकी मिळकतधारकांची नळजोडणी तात्पुरत्या स्वरूपात तोडण्यात येत आहे. तसेच थकबाकीची रक्कम न भरता परस्पर नळजोडणी करणाऱ्या मिळकतधारकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. सध्या दहा हजार रुपयांच्या वर थकबाकी मिळकतधारकांना जप्ती वॉरंट काढण्यात येत आहे.

Web Title: 30 lakh revenue collected in one day in NMC treasury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.