३० पोलीस हवालदार झाले सहायक उपनिरीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:17 AM2021-02-11T04:17:00+5:302021-02-11T04:17:00+5:30
पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असलेले हवालदार व नाईक या पदावरील कर्मचाऱ्यांना त्यांचा सेवा कार्यकाळ व कामगिरी लक्षात ...
पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असलेले हवालदार व नाईक या पदावरील कर्मचाऱ्यांना त्यांचा सेवा कार्यकाळ व कामगिरी लक्षात घेत पदोन्नती देण्यात आली. सुमारे ४१ कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाल्याने त्यांच्यासह उपस्थित कुटुंबीयांच्याही चेहऱ्यांवर आनंद झळकलेला पाहावयास मिळाला. सर्व अंमलदारांना योग्य त्या वेळेत पदोन्नती दिली गेल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सहायक निरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आलेल्या ३० कर्मचाऱ्यांच्या खांद्यांवर सन्मानपूर्वक ‘पंचकोणी स्टार’ व लाल-निळ्या रंगाची फीत लावण्यात आली. तसेच हवालदारपदी पदोन्नती मिळालेल्या ११ कर्मचाऱ्यांच्या वर्दीवर फीत चढविण्यात आली.
पोलीस दलात कार्यरत असताना सर्वसामान्यांच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर राहावे, तसेच समाजातील वाईट प्रवृत्तींना आळा घालण्याकरिता कायद्याचा प्रभावी वापर करत आपली कारकीर्द यशस्वी करावी, असे आवाहन यावेळी पाण्डेय यांनी उपस्थित पदोन्नती प्राप्त पोलिसांना केले. यावेळी उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार, विजय खरात, पौर्णिमा चौगुले आदी उपस्थित होते.