विरोध करणाऱ्या ३० आंदोलकांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 01:14 AM2019-06-29T01:14:08+5:302019-06-29T01:14:23+5:30
पुनंद प्रकल्पातून जाणाºया सटाणा नगर परिषदेच्या जलवाहिनी योजनेच्या कामाला शुक्रवारी (दि. २८) सकाळी पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाल्याने या योजनेला विरोध करण्यासाठी जाणाºया जयदर येथील पुनंद प्रकल्प जलवाहिनी विरोधी कृती समितीच्या ३० कार्यकर्त्यांना अभोणा पोलिसांनी अटक केली.
कळवण : पुनंद प्रकल्पातून जाणाºया सटाणा नगर परिषदेच्या जलवाहिनी योजनेच्या कामाला शुक्रवारी (दि. २८) सकाळी पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाल्याने या योजनेला विरोध करण्यासाठी जाणाºया जयदर येथील पुनंद प्रकल्प जलवाहिनी विरोधी कृती समितीच्या ३० कार्यकर्त्यांना अभोणा पोलिसांनी अटक केली. दरम्यान या योजनेला विरोध म्हणून शनिवारी (दि.२९) कृती समिती व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी कळवण बंदची हाक दिली आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात योजनेच्या कामास सकाळी १० वाजता सुरु वात झाल्याचे समजताच पिंपळे बु ।।, सिद्धेश्वर मार्गे गनिमी काव्याने धाव घेणाºया नेते व कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या नाकेबंदीमुळे जयदर मार्गे जाण्याचा घेण्याचा प्रयत्न केला.
जयदर पाटबंधारे वसाहतजवळून पुनंदकडे जलवाहिनी विरोधी घोषणा देत जाणाºया कार्यकर्त्यांना अभोणा पोलिसांनी चौफुलीवर अडवून पुनंदकडे जाण्यास मज्जाव केला. तालुक्यात टप्प्याटप्प्याने साखळी आंदोलन करून जनतेचा विरोध न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला जाणार आहे. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष देविदास पवार, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार ,शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर यांनी जलवाहिनीला विरोध दर्शविला. मुंबई उच्च न्यायालयाने योजनेच्या कामात व्यत्यय व विरोध करणाºया व्यक्ती विरोधात प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचे आदेश दिले असल्याने न्यायालयीन कामकाजात अडथळा आणू नका व न्यायालयाचा अवमान करू नका अशी विनंती अभोणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांनी आंदोलकांना केली. आंदोलक पुनंदकडे धाव घेण्यासाठी घोषणाबाजी करत असताना अभोणा पोलिसांनी देविदास पवार , नितीन पवार , कारभारी आहेर, राजेंद्र भामरे ,अंबादास जाधव ,महेंद्र हिरे हेमंत पाटील , शांताराम जाधव ,अण्णा पाटील ,मोहन जाधव ,बाळासाहेब शेवाळे ,जितेंद्र वाघ , विलास रौंदळ, संदीप वाघ ,मुन्ना वाघ ,रामा पाटील ,देसराण्याचे महेंद्र हिरे ,प्रवीण रौंदळ ,पंकज जाधव ,े पंकज जाधव ,गंगाधर शेवाळे ,काशिनाथ गुंजाळ ,मोहन जाधव ,दादाजी बोरसे ,हेमंत पगार ,संजय मोरे ,दिलीप शिंदे ,रमेश जाधव आदीसह ३० जणांना अटक करून अभोणा पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध केले व सायंकाळी सोडून दिले.
बैठकीत आंदोलनाची दिशा
कळवण येथील शासकीय विश्रामगृहावर कृती समतिी ,नेते व सर्वपक्षीय पदाधिकारी यांची संयुक्त बैठक होऊन त्यात कळवण तालुक्यात निर्माण झालेली पाणी परिस्थिती ,पाणी पळविण्याचे राजकारण ,न्यायालयातील धाव ,लोकप्रतिनिधी यांची अनास्था , तालुक्यातील जनतेची एकजूट व आंदोलन करण्याबाबत भूमिकाबाबत चर्चा झाली. कळवण तालुक्यात जलवाहिनी योजनेविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.
सोमवारी होणार बैठक
पुनंद प्रकल्प जलवाहिनी
योजनेला विरोध म्हणून शनिवारी (दि.२९) कृती समिती, सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून कळवण बंदची हाक देण्याची आली आहे. शनिवारी व रविवारी तालुक्यात गावोगावी बैठका घेऊन जनजागृती करण्यात येणार असून, सोमवार, दि.१ जुलै रोजी कळवण येथे लाभक्षेत्रातील शेतकरी व आदिवासी
बांधवांची संयुक्त बैठक घेऊन जलवाहिनी विरोधी आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.
त्यानंतर तालुक्यात टप्प्याटप्प्याने साखळी आंदोलन करून तालुक्यातील जनतेचा असलेला विरोध शासनाच्या व न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला जाणार असल्याचे पुनंद प्रकल्प जलवाहिनी विरोधी कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले.