नाशकात महिनाभरात 30 रेमडेसीव्हिर जप्त; 10 संशयितांना बेड्या; डॉक्टर, नर्स, वार्डबॉयसह, केमिस्टकडून काळाबाजार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 01:05 PM2021-05-18T13:05:37+5:302021-05-18T13:05:47+5:30

पोलीस आयुक्तालयातील पंचवटी, आडगाव तसेच म्हसरूळ या तीनही पोलीस ठाण्याच्या हद्दीत अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत महिन्याभरात तब्बल 10 संशयित आरोपींना बेड्या ठोकून त्यांच्याकडून जवळपास 30 इंजेक्शन जप्त केले आहे.

30 Ramdesivir seized in Nashik in a month | नाशकात महिनाभरात 30 रेमडेसीव्हिर जप्त; 10 संशयितांना बेड्या; डॉक्टर, नर्स, वार्डबॉयसह, केमिस्टकडून काळाबाजार 

नाशकात महिनाभरात 30 रेमडेसीव्हिर जप्त; 10 संशयितांना बेड्या; डॉक्टर, नर्स, वार्डबॉयसह, केमिस्टकडून काळाबाजार 

Next


नाशिक- कोरोना कालावधीत रुग्णांना मदत करणारे अनेक हात पुढे येत असतांना समाजातील काही महाभाग कोरोना रुग्णांना लागणारे रेमडेसिव्हिर इंजेक्शन चढ्या दराने विक्री करत आहेत. या इजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीने चांगलाच हायदोस माजविला आहे. विशेष म्हणजे या टोळीत रुग्ण सेवा बजावणाऱ्या डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय तसेच मेडिकल दुकानदारांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलीस आयुक्तालयातील पंचवटी, आडगाव तसेच म्हसरूळ या तीनही पोलीस ठाण्याच्या हद्दीत अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत महिन्याभरात तब्बल 10 संशयित आरोपींना बेड्या ठोकून त्यांच्याकडून जवळपास 30 इंजेक्शन जप्त केले आहे. पंचवटी परिसरातील जुना आडगाव नाका या ठिकाणी एका रूग्णालयात रुग्णाला एक इंजेक्शन 30 हजार रुपये किमतीला विक्री करताना खुद्द एका डॉक्टरला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून पोलिसांनी तीन रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केले होते. सदर घटनेला काही दिवस लोटत नाही, तोच मखमलाबादला  एका वॉर्डबॉयकडून गुन्हे शाखेनच्या पोलिसांनी तब्बल पाच रेमडीसीविर जप्त केले. एका रुग्णालयात काम करणारा हा रुग्णांना घरी सलाईन लावण्याचे काम करायचा. रुग्णांना घरी जाऊन इंजेक्शनदेखील द्यायचा. यावेळी रुग्णांचे उरलेले इंजेक्शन चोरून तो स्वतःजवळच ठेवायचा व ते इतर रुग्णांना काळ्याबाजारात विक्री करायचा. 

गेल्या आठवड्यात आडगाव पोलिसांनी आडगाव शिवारात असलेल्या क का वाघ महाविद्यालयासमोर 54 हजार रुपयात दोन रेमडेसिव्हिर इंजेक्शन विक्री करताना दोन नर्सना ताब्यात घेतले होते. चौकशीअंती यात आणखी एक नर्स व मेडिकल दुकानात काम करणाऱ्या युवकाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी सुरुवातीला तीन नर्स व एका मेडिकल दुकानात काम करणाऱ्या अशा चौघांना बेड्या ठोकल्या होत्या व त्यांच्याकडून दोन इंजेक्शन जप्त केले होते. या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच पालघर जिल्ह्यातील काही जण इंजेक्शन पुरवठा करत असल्याचे निष्पन्न झाल्याने, आडगाव पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी एकाला नाशिकमधून तर तिघांना वाडा येथून अटक करत त्यांच्याकडून 20 रेमडेसिविर जप्त केल्या. आडगाव पोलिसांनी केलेली आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असून काळाबाजार करणाऱ्या आणखीन काही संशयितांची धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.
 

Web Title: 30 Ramdesivir seized in Nashik in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.