जिल्ह्यातील धरणांमध्ये ३० टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 10:12 PM2020-07-04T22:12:05+5:302020-07-04T23:26:43+5:30
नाशिक : यंदा मान्सूनचे वेळेत आगमन होऊन पाच तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली असली तरी जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय अशी वाढ झाल्याचे दिसून येत नाही. जिल्ह्यात ३ जुलैअखेर ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : यंदा मान्सूनचे वेळेत आगमन होऊन पाच तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली असली तरी जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय अशी वाढ झाल्याचे दिसून येत नाही. जिल्ह्यात ३ जुलैअखेर ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
जिल्ह्यात अद्याप पेठ आणि सुरगाण्यात अपेक्षित अशी पावसाची नोंद झालेली नाही तर बागलाण तालुक्यात सर्वाधिक वार्षिक सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक ७८ टक्के पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. खरिपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात असल्या तरी अनेक भागात अद्यापही बियाणांचा व खतांचा तुटवडा भासत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.
जिल्ह्यात छोटे-मोठे २४ सिंचन प्रकल्प आहेत. यंदा मान्सूनचे वेळेत आगमन झाल्याने जिल्ह्यात पेठ, सुरगाणा तालुकेवगळता अन्य तालुक्यांमध्ये बºयापैकी पावसाने हजेरी लावलेली आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये सद्यस्थितीत ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
मागील वर्षी ३ जुलैअखेर अवघा ६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यंदा मात्र समाधानकारक स्थिती आहे. प्रामुख्याने गंगापूर (४५ टक्के), पालखेड (३२ टक्के), ओझरखेड (४० टक्के), दारणा (४२ टक्के), भावली (३४ टक्के), नांदूरमधमेश्वर (८९ टक्के), हरणबारी (५१ टक्के), गिरणा (३७ टक्के) आणि पुनंद (४५ टक्के) या धरणांमध्ये ३० टक्क्यांहून अधिक साठा आहे.
वाघाड, करंजवण, पुणेगाव, तिसगाव, वालदेवी, कडवा, भोजापूर, चणकापूर, केळझर, नागासाक्या या धरणांतील पाणीसाठा समाधानकारक नाही. सध्या खरिपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात असल्या तरी काही भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अनेक भागात बियाणांचा तसेच युरियासारख्या खतांचा तुटवडा जाणवत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. गतवर्षापेक्षा ११ टक्के अधिक पाऊस जिल्ह्यात ३ जुलैअखेर २६.६२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी १५.५ टक्के
पाऊस झाला होता. यंदा त्यात ११ टक्क्यांनी भर पडली आहे. जिल्ह्यातील मालेगाव (७१.९० टक्के), बागलाण (७८.४ टक्के), देवळा (५८.२२ टक्के), निफाड (७५.४३ टक्के) तर सिन्नर (५६.८८ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. पेठ-सुरगाणावगळता अन्य तालुक्यात समाधानकारक स्थिती आहे. यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज यापूर्वीच हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील दोन तालुके वगळता अन्यत्र आतापर्यंत समाधानकारक पावसाची नोंद झालेली आहे. यंदा सर्वाधिक पावसाची नोंद बागलाण तालुक्यात
झालेली आहे.