ठक्कर डाेम येथे लवकरच तीनशे खाटांचे कोविड सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:16 AM2021-04-07T04:16:01+5:302021-04-07T04:16:01+5:30

नाशिक- शहरात कोरोना संसर्ग रोगाची परिस्थिती गंभीर होत असून, त्या तुलनेत खासगी आणि महापालिकेच्या बेडसची संख्या अपुरी पडत ...

A 300-bed covid center soon at Thakkar Dam | ठक्कर डाेम येथे लवकरच तीनशे खाटांचे कोविड सेंटर

ठक्कर डाेम येथे लवकरच तीनशे खाटांचे कोविड सेंटर

Next

नाशिक- शहरात कोरोना संसर्ग रोगाची परिस्थिती गंभीर होत असून, त्या तुलनेत खासगी आणि महापालिकेच्या बेडसची संख्या अपुरी पडत असल्याने त्र्यंबकरोडवर ठक्कर डोम येथे तीनशे खाटांचे केाविड सेंटर लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली. शहरातील नवीन कोविड सेंटर्स सुरू करण्याची गरज असून, त्या दृष्टीने महापौर कुलकर्णी तसेच आमदार ॲड. राहुल ढिकले, तसेच सभागृह नेता सतीश कुलकर्णी यांनी तीनशे खाटांचे कोविड सेंटर्स सुरू करण्याच्या दृष्टीने पहाणी केली. याठिकाणी कोविड केअर सेंटरचे काम अतिशय वेगाने सुरू असून, येत्या तीन ते चार दिवसात काम पूर्ण होऊन या ठिकाणी बाधित रुग्णांना उपचार करण्यासाठी ठेवण्याची व्यवस्था कार्यान्वित होणार आहे, असे महापौरांनी सांगितले. मनपाच्यावतीने समाज कल्याण विभागाचे वसतिगृह व पंचवटी भागातील मेरी येथील पंजाबराव देशमुख वसतिगृह येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून, नाशिक शहरातील रुग्णांना व्हेंटिलेटर व ऑक्सिजनचे बेड उपलब्ध होत नसल्याने सातत्याने महापौरांकडे दूरध्वनी येत आहे. त्यामुळे नवीन कोविड सेंटर लवकर सुरू करण्यासाठी हा दौरा आयोजित केला होता. सध्या झाकीर हुसेन रुग्णालयात पंधरा व नवीन बिटको हॉस्पिटल येथे २१ असे एकूण ३६ व्हेंटिलेटर बेड कार्यान्वित असून, झाकीर हुसेन येथे ९४ ऑक्सिजन बेड व नवीन बिटको हॉस्पिटल येथे २०५ ऑक्सिजन बेड कार्यान्वित आहे. सध्या ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने नवीन बिटको हॉस्पिटल येथे नव्याने २०० ऑक्सिजन बेड रुग्णांना उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. त्यापैकी ६० ऑक्सिजन बेड सुरु करण्यात आले आहेत, असेही महापौर कुलकर्णी यांनी सांगितले.

इन्फो...

शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून, रुग्णालये कमी पडत असल्याने शहरात नागरिकांच्या साेयीने आणखी काही कोविड सेंटर्स सुरू करण्याचा विचार असल्याचे महापौर कुलकर्णी यांनी सांगितले.

===Photopath===

060421\06nsk_56_06042021_13.jpg

===Caption===

त्र्यंबकरोड वरील ठक्कर डोम या नियोजीत कोविड केअर सेंटरची पहाणी करताना महापौर सतीश कुलकर्णी समवेत आमदार राहुल ढिकले तसेच सतीश सोनवणे आदी.

Web Title: A 300-bed covid center soon at Thakkar Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.