३०० किलो वांग्याचे भरीत अन् बाजरीच्या २५०० भाकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 05:51 PM2018-12-12T17:51:22+5:302018-12-12T17:51:43+5:30

सिन्नर: प्रतिजेजुरी म्हणून ख्याती असलेल्या सिन्नर तालुक्यातल्या मºहळ खुर्द येथील खंडेराव महाराज मंदिरात चंपाषष्ठी उत्सावाची जय्यत करण्यात आली आहे.

300 kg of eggplant and 2500 breadth of bajra | ३०० किलो वांग्याचे भरीत अन् बाजरीच्या २५०० भाकरी

३०० किलो वांग्याचे भरीत अन् बाजरीच्या २५०० भाकरी

Next

सिन्नर: प्रतिजेजुरी म्हणून ख्याती असलेल्या सिन्नर तालुक्यातल्या मºहळ खुर्द येथील खंडेराव महाराज मंदिरात चंपाषष्ठी उत्सावाची जय्यत करण्यात आली आहे. परिसरातील चार गावांचे भाविक मंदिरात जागरण गोंधळ घालणार असून एकच लंगर तोडला जाणार आहे. गाव व परिसरातील भाविकांना महाप्रसाद वाटण्यासाठी ३०० किलो वांग्याचे भरीत व सुमारे २५०० बाजरीच्या भाकरी करण्याची तयारी सुरु आहे.
सिन्नर तालुक्यातल्या मºहळ खुर्द येथे माघ पौर्णिमेला म्हणजे साधारणत: फ्रेबु्रवारी महिन्यात मोठी मोठा यात्रोत्सव भरतो. त्याचबरोबर येथे चंपाषष्ठी उत्सवही मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. चंपाषष्ठी उत्सवानिमित्ताने गुरुवारी सायंकाळी ८ वाजता खंडेराव महाराजांची आरती, तळीभंडार व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. महाप्रसाद म्हणून वांग्याचे भरीत व बाजरीची भाकरी करण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून जोपासली जात आहे. मºहळ खुर्द, मºहळ बुद्रुक, सुरेगाव व पांगरी या तीन गावातील भाविक यावेळी होणाऱ्या सामुदायिक जागरण गोंधळाच्या कार्यक्रमास उपस्थितीत राहातात. सुमारे तीन हजार भाविकांच्या उपस्थितीत पहाटे लंगर तोडण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला जातो.
सामुदायिक एकच जागरण गोंधळ व लंगर तोडण्याच्या कामाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. गोंधळी म्हणून निमगाव-गुळवंच येथील मंडळ हजेरी लावणार आहे. सुमारे दोन हजार भाविकांच्या महाप्रसादासाठी ३०० किलो वांगे व सुमारे २५०० भाकरी बनविण्यात येणार आहेत. येथील सुदाम रामचंद्र कुटे यांनी अन्नदानाची जबाबदारी उचलली आहे.
चंपाषष्ठी उत्सावानिमित्ताने मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली असून मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ च्या गजरात जागरण गोंधळ व लंगर तोडण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात भाविक मोठ्या संख्येने उपस्थितीत राहतात. चंपाषष्ठी उत्सव उत्साहात पार पाडण्यासाठी मºहळ खुर्द, मºहळ बुद्रुक, सुरेगाव व पांगरी ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत.

Web Title: 300 kg of eggplant and 2500 breadth of bajra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक