मदतीसाठी ११ हजार कृषी सहाय्यक सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 12:57 PM2020-03-30T12:57:43+5:302020-03-30T12:57:55+5:30
येवला : कोरोनाने उद्भवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी जो तो स्वेच्छेने मदतीचा हात पुढे करत आहे. अशा अडचणीच्या काळात आता राज्यातील कृषी सहाय्यक देखील पुढे सरसावले आहे. राज्यातील सुमारे ११ हजार कृषी सहाय्यकांनी आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देत सामिजक हातभार लावला आहे.

राज्य कृषी सहायक संघटनेचे राज्याध्यक्ष सोमनाथ बाचकर,राज्य सरचिटणीस वसंत जारिकोटे,राज्य कार्याध्यक्ष धनंजय सोनुने, कोषाध्यक्ष अनंत देशमुख यांनी निर्णय घेऊन याबाबतची घोषणा केली. मालेगाव येथील समाधान पाटील यांनी मालेगाव येथे कृषिमंत्री दादा भुसे घेऊन त्यांना याबाबत पत्र दिले. भुसे यांनी संघटनेचे घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. या कोरोना व्हायरसवर मात करून राज्य सुजलाम सुफलाम होईल अशी आशा व्यक्त केली. कोरोनाचे संकट भयानक असून महाराष्ट्र शासन संवेदनशीलपणे ही परिस्थिती हाताळत आहे. राज्यातील आरोग्य पोलीस,प्रशासन, कृषी विभागाचे सर्व प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी जीव धोक्यात घालून जनतेचा जीव वाचिवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अशा अडचणीच्या काळात आमची ही काहीतरी सामाजिक बांधिलकी आहे.या हेतूने या आपत्तीला दूर करण्यासाठी मदतीचा हात म्हणून या कृषी सहायकांनी एक दिवसाचे सुमारे दीड कोटी रु पयांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी स्वेच्छेने दिले आहे. एप्रिलच्या पगारातून ही कपात करण्यात यावी असे या पत्रात म्हटले आहे. नाशिकचे राज्य प्रतिनिधी बापूसाहेब शेंडगे, जिल्हाध्यक्ष शरद थेटे, कार्याध्यक्ष अरविंद आढाव, हितेंद्र पगार, प्रकाश जवने, साईनाथ कालेकर आदींनी ही माहिती दिली.