प्लास्टिकबंदीमुळे बेरोजगारीची कुºहाड उद्योजक संकटात : नाशकात तीन हजार कुटुंबांना उपासमारीची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 01:00 AM2018-04-02T01:00:47+5:302018-04-02T01:00:47+5:30
नाशिक : पर्यावरणाचा ºहास होत असल्याच्या कारणावरून राज्य सरकारने प्लास्टिकबंदी आणली.
नाशिक : पर्यावरणाचा ºहास होत असल्याच्या कारणावरून राज्य सरकारने प्लास्टिकबंदी आणली. मात्र, प्लास्टिकच्या निर्मितीत रोजगार असणाऱ्या हजारो कामगारांची यामुळे उपासमार होण्याची भीती निर्माण झाली आहे. नाशिक औद्योगित क्षेत्रात सुमारे तीन हजार कुटुंबांना या उद्योगामधून रोजगार मिळत असून प्लास्टीकबंदीमुळे त्यांच्यावर उपासमारीचे संकट कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. रोजगार संकटात येण्याबरोबर शेतीक्षेत्रालाही प्लास्टिकबंदीचा निर्णय प्रभावित करणार असल्याने दुधासोबतच अन्नधान्य, फळे, भाज्यांसारख्या खाद्यपदार्थांच्या पॅकिंगमध्येही प्लास्टिक वापरास मुभा देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. राज्यात अडीच हजारांहून अधिक प्लास्टिक बॅग उत्पादक आहेत. त्यांच्याद्वारे ८० हजारांहून जास्त नागरिकांना थेट रोजगार मिळतो. यापैकी नाशिकमध्ये जवळपास ५०० प्लास्टिक बॅग उत्पादक नाशिकमध्ये आहेत. त्यापैकी २०० उद्योग प्लास्टिकचा पुनर्वापर करून बॅग तयार करतात. प्लास्टिक बॅग उत्पादन हा सूक्ष्म आणि लघुउद्योग विभागात मोडणारा व्यवसाय असला तरी नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात सुमारे ५०० कोटीं रुपयांच्या प्लास्टीक बॅगचे उत्पादन होते. तर बाजारपेठेत स्थानिक व बाहेरील उद्योजकांकडून येणाºया प्लास्टिक पिशव्यांसह जवळपास एक हजार कोटींची या व्यवसायात उलाढाल होते. त्यामुळे विविध उद्योजकांचे जवळपास ८०० ते ९०० कोटी रुपये सद्यस्थितीला या व्यवसायात अडकून पडलेले आहेत. प्लास्टिकबंदीमुळे हा व्यवसाय धोक्यात आला असून हा पैसाही बुडीतात जाण्याची भिती व्यावसायिकांसमोर निर्माण झाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी स्वत:च्या यंत्रणा राबवून प्लास्टिकचे संकलन व पुनर्प्रक्रिया करून प्लास्टिक बॅग तयार करण्याची तयारी उद्योजकांनी दाखवली आहे. बदलत्या परिस्थितीत शेतीक्षेत्राचेही प्लास्टिक पिशव्यावरील अवलंबित्व वाढले आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून वाहतूक होणारा शेतमाल याच प्लास्टिकच्या पिशव्यांमधून जात असतो. या पिशव्या पारदर्शी असल्याने व्यापारी आणि शेतकºयांमध्ये सहज व्यवहार होऊन मालाचे नुकसान टळते. त्यामुळे शेतकरी व व्यापारी मोठ्या प्रमाणात अशा पिशव्यांचा वापर करतात. कंपोस्ट प्लास्टिकपासून बनवलेल्या पिशव्या पारदर्शक नसल्याने व वजन क्षमता कमी असल्याने उपयोगात येत नाही. तसेच ठिबक सिंचनसाठी वाफ्यावर पसरण्यासाठी प्लास्टिकचा मल्चिंग पेपर वापला जात असून, असे प्लास्टिक बंद झाल्याने शेती क्षेत्रालाही या प्लास्टिकबंदीचा फटका बसणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे..