शिष्यवृत्तीसाठी ५४ हजार विद्यार्थ्यांची कसोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:45 AM2020-02-17T00:45:11+5:302020-02-17T00:46:28+5:30
महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे रविवारी (दि. १६) नाशिक जिल्ह्यातील एकूण ३३९ परीक्षा केंद्रांवर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) घेण्यात आली. या परीक्षेला जिल्हाभरातून एकूण ५७ हजार ६४० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सुमारे ५४ हजार ८१६ विद्यार्त्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून ही परीक्षा दिली. तर २ हजार ८२४ विद्यार्थ्यांनी या परीक्षेला दांडी मारली.
नाशिक : महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे रविवारी (दि. १६) नाशिक जिल्ह्यातील एकूण ३३९ परीक्षा केंद्रांवर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) घेण्यात आली. या परीक्षेला जिल्हाभरातून एकूण ५७ हजार ६४० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सुमारे ५४ हजार ८१६ विद्यार्त्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून ही परीक्षा दिली. तर २ हजार ८२४ विद्यार्थ्यांनी या परीक्षेला दांडी मारली.
नाशिक शहरासह संपूर्ण जिल्हाभरात सकाळी ११ ते १२.३० दरम्यान २५ प्रश्नांसाठी ५० गुण असलेल्या प्रथम भाषेचा व शंभर गुणांसाठी ५० प्रश्न असलेल्या गणित विषयाचा समावेश असलेला पेपर एकसाठी परीक्षा घेण्यात आली. तर दुपारच्या सत्रात १ ते ३ वाजेच्या दरम्यान २५ प्रश्नांसाठी ५० गुण असलेल्या तृतीय भाषा, ५० प्रश्नांसाठी गुणांची बुद्धिमता चाचणी या विषयांची परीक्षा घेण्यात आली. नाशिक जिल्ह्यात पाचवीचे ३२ हजार ८६२ विद्यार्थी १८६ केंद्रांवर तर १५३ केंद्रांवर आठवीचे २४ हजार ७७८ असे एकूण ५७ हजार ६४० विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ५४ हजार ८१६ विद्यार्थ्यांनी सकाळच्या आणि दुपारच्या अशा दोन्ही सत्रातील पेपर दिले. तर २ हजार ८२४ विद्यार्थ्यांनी या परीक्षेला दांडी मारली. महाराष्ट्र परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या या परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण घोषित करण्यात येणार नाही. तर पात्र अथवा अपात्र घोषित करण्यात येणार आहे. प्रत्येक पेपरमध्ये किमान ४० टक्के गुण प्राप्त करणारे विद्यार्थी या परीक्षेला पात्र ठरणार असून पात्र विद्यार्थ्यांमधून गुणवत्तेनुसार व प्रचलित निकषांच्या आधारे जिल्हास्तरीय मंजूर शिष्यवृत्ती संच संख्येच्या मर्यादेत गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
पालकांची कसरत
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पाल्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहचविताना पालकांना रविवारी चांगलीच कसरत करावी लागली. रस्त्यावर ठिकठिकाणी पोलिसांकडून हेल्मेट आणि क्षमताबाह्य वाहतुकीच्या कारणांमुळे पालकांना अडवले जात असल्याने पाल्यांना परीक्षा कें द्रावर वेळेच पोहोचविताना विलंब होत असल्याचे दिसून आले. शिष्यवृत्ती परीक्षेमुळे शहरात परीक्षा केंद्र असलेल्या प्रमुख शाळांच्या सकाळच्या सत्रात पाल्यांना घेऊन आलेल्या पालकांची मोठी गर्दी दिसून आली.