मालेगावी मनपा कोविड सेंटरच्या ३०५ खाटा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:10 AM2021-06-03T04:10:56+5:302021-06-03T04:10:56+5:30

मार्च महिन्यात दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर महापालिकेने सहारा सेंटरची ऑक्सिजन बेड क्षमता वाढवून २२० केली हाेती. पहिली लाट ओसरल्यानंतर ...

305 seats of Malegaon Municipal Kovid Center vacant | मालेगावी मनपा कोविड सेंटरच्या ३०५ खाटा रिक्त

मालेगावी मनपा कोविड सेंटरच्या ३०५ खाटा रिक्त

Next

मार्च महिन्यात दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर महापालिकेने सहारा सेंटरची ऑक्सिजन बेड क्षमता वाढवून २२० केली हाेती. पहिली लाट ओसरल्यानंतर बंद केलेले मसगा व हज ट्रेनिंग सेंटर पुन्हा कार्यान्वित केले हाेते. मसगाच्या दाेन केंद्रांवर १००, तर हज व दिलावर सभागृहातील सेंटरमध्ये प्रत्येकी ४५ बेडची व्यवस्था हाेती. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तीनही सेंटरची रुग्णसंख्या फुल्ल हाेती. मात्र, दुसरी लाट ओसरू लागल्याने रुग्णांचा आलेखही कमालीचा घसरला आहे. लाॅकडाऊन, लसीकरण, चाचण्या व जनतेत निर्माण झालेली जागरूकता यामुळे सकारात्मक परिणाम पहावयास मिळाले आहेत. राेगप्रतिकारशक्ती वाढीस लागत असल्याने नवीन बाधित रुग्णांचा आकडा घटून बरे हाेणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील वाढत आहेत. सहारा सेंटरमध्ये १५ मे राेजी ७२ रुग्ण दाखल हाेते. या संख्येत दिवसेंदिवस घट झाली. २५ मेला ५५ असलेली रुग्णसंख्या आठ दिवसांत ३५वर आली आहे. रुग्णसंख्येचा घटता आलेख कायम राहिल्यास इतर सेंटर बंद करून केवळ सहारा सेंटर सुरू ठेवणार असल्याचे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी सांगितले.

इन्फो

हज व दिलावर सेंटर शून्यावर

मनपाने हज ट्रेनिंग सेंटरमध्ये ४५ ऑक्सिजन बेड तयार केले हाेते. प्रारंभी हे सेंटरही फुल्ल हाेते. काही दिवसांपूर्वी १८ रुग्णांवर उपचार सुरू हाेते. गेल्या आठवड्यात केवळ सहा रुग्ण दाखल हाेते. आजराेजी एकही रुग्ण नसल्याने सेंटर शून्यावर आले आहे. रुग्ण नसल्यामुळे सेंटर बंद आहे. मात्र, ते अधिकृतरीत्या बंद केले नसल्याची माहिती आराेग्याधिकारी डाॅ. सपना ठाकरे यांनी दिली.

इन्फो

काेविड सेंटरचे नाव , दाखल रुग्ण, (कंसात रिक्त बेड)

सहारा हाॅस्पिटल - २७ ( १५०)

मसगा सेंटर - ३५ ( ६५)

हज सेंटर - ०० (४५)

दिलावर सेंटर - ०० (४५)

फोटो - ०२ मालेगाव हॉस्पिटल-३

मालेगाव येथील मसगा कोविड सेंटर मध्ये रूग्णांअभावी रिकाम्या असलेल्या खाटा.

===Photopath===

020621\02nsk_26_02062021_13.jpg

===Caption===

फोटो - ०२ मालेगाव हॉस्पिटल-३ मालेगाव येथील मसगा कोविड सेंटर मध्ये रूग्णांअभावी रिकाम्या असलेल्या खाटा. 

Web Title: 305 seats of Malegaon Municipal Kovid Center vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.