३१ लाखांना आॅनलाइन गंडविणारे त्रिकुट ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 10:58 PM2020-09-12T22:58:56+5:302020-09-13T00:23:49+5:30

नाशिक : लंडनस्थित एका औषधी कंपनीला मेंदूवरील आजाराशी निगडित औषध बनवायचे असून, त्यासाठी लागणाऱ्या ‘जिन्सेन’ नावाच्या औषधी बियांची मागणी होत आहे. अरुणाचलप्रदेशमधील बालाजी एंटरप्रायजेसकडून बियांची खरेदी करण्यास सांगून ३१ लाख २७ हजार रुपयांना गंडा घालणाºया दोघा संशयितांना कांदीवलीमधून तर एकास राजस्थानच्या भीलवाडामधून सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

31 lakh online scam trio arrested | ३१ लाखांना आॅनलाइन गंडविणारे त्रिकुट ताब्यात

३१ लाखांना आॅनलाइन गंडविणारे त्रिकुट ताब्यात

Next
ठळक मुद्देकांदीवली, राजस्थानमधून अटक : बहुगुणी औषधी बियांच्या खरेदीचा बनाव

नाशिक : लंडनस्थित एका औषधी कंपनीला मेंदूवरील आजाराशी निगडित औषध बनवायचे असून, त्यासाठी लागणाऱ्या ‘जिन्सेन’ नावाच्या औषधी बियांची मागणी होत आहे. अरुणाचलप्रदेशमधील बालाजी एंटरप्रायजेसकडून बियांची खरेदी करण्यास सांगून ३१ लाख २७ हजार रुपयांना गंडा घालणाºया दोघा संशयितांना कांदीवलीमधून तर एकास राजस्थानच्या भीलवाडामधून सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, फेसबुकवर ग्रेस नावाच्या एका स्त्रीच्या प्रोफाइलवरून शहरातील एका राजकीय व्यक्तीला मैत्रीची विनंती पाठविली. त्या व्यक्तीने ती विनंती स्वीकारली आणि नंतर व्हॉट््सअ‍ॅप क्रमांक माहिती करून घेत त्यांच्याशी चॅटिंग करण्यास सुरुवात केली. फिर्यादीचा विश्वास जिंकल्यानंतर या व्यक्तीने जॅक्सन, रॉलिन्स, बालाजी त्यागी अशा विविध नावाने वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून व्हॉट््सअ‍ॅप व ई-मेलद्वारे संपर्क साधून जवळीक वाढविली. लंडनस्थित हेल्थ केअर नावाच्या औषधी कंपनीला भारतातून जिन्सेन नावाच्या बियांची खरेदी करावयाची आहे. यासाठी नवीन पुरवठादार शोधत असल्याचा बनाव केला. बियांच्या पुरवठ्याच्या मोबदल्यात नफा निम्मा-निम्मा वाटून घेण्याचे आश्वासन दिले. यानंतर फिर्यादी यास अरुणाचलप्रदेशच्या बालाजी एंटरप्रायजेसचा पत्ता सांगून तेथून बियांची खरेदी करा म्हणून एक मोबाइलक्रमांक दिला. यानंतर फिर्यादी याने तेथे संपर्क साधला असता एंटरप्रायजेसक डून विविध कारणे सांगितली गेली, मात्र बियांचा पुरवठा झाला नाही, याउलट वेळोवेळी त्या राजकीय व्यक्तीकडून पैसे उकळून सुमारे ३१ लाख २७ हजार रुपयांना संबंधितांनी चुना लावला. आपली फसवणूक झाल्याचे कळताच त्याने सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली.

दहा दिवसांत गुन्'ाचा छडा
२ सप्टेंबर रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरविली. मिळालेल्या सुगाव्यावरून पोलिसांच्या पथकाने कांदीवली गाठले. तेथून अभिषेक रमेश जैन (३३,रा. गणेशनगर, कांदिवली), नितीन प्रभाकर पवार (३८,रा. मुर्गीवाला चाळ, कांदिवली) यांना सर्वप्रथम अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असत्या या दोघांच्या बॅँक खात्यावर रक्कम जमा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून राजस्थानच्या भिलवाडामधील तिसºया साथीदाराची माहिती काढली. किशनलाल प्रभू तेली (२६, रा. भगतबाबारोड, दादाबाडी, भिलवाडा) याच्या मुसक्या बांधल्या. या तिघांनी मिळून फेसबुकचा वापर करत फिर्यादी असलेल्या एका राजकीय व्यक्तीला गंडा घातला होता. सायबर पोलिसांनी प्रथमच इतक्या तत्परतेने एखाद्या गुन्'ाचा छडा लावून संशयितांच्या बेड्या ठोकल्या. गुन्हा दाखल होताच दहा दिवसांत उलगडा करण्यास पोलीस यशस्वी झाले.

 

Web Title: 31 lakh online scam trio arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.