पंचवटी प्रभाग बैठकीत ३१ लाखांच्या कामांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:20 AM2021-02-17T04:20:27+5:302021-02-17T04:20:27+5:30
या बैठकीत पंचवटी विभागातील हिरावाडीतील कमलनगर येथील हायमास्ट स्थलांतर करणे, महालक्ष्मीनगरला ग्रीन जिम बसविणे, साईन बोर्ड बसविणे, रामवाडीतील समाजमंदिर ...
या बैठकीत पंचवटी विभागातील हिरावाडीतील कमलनगर येथील हायमास्ट स्थलांतर करणे, महालक्ष्मीनगरला ग्रीन जिम बसविणे, साईन बोर्ड बसविणे, रामवाडीतील समाजमंदिर दुरुस्ती करणे, गंगापूर कॅनॉल ते पिंगळे वस्तीपर्यंतचा रस्ता खडीकरण करणे, हनुमानवाडीत ग्रीन जिम बसविणे विविध विषयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. बैठकीत झालेल्या चर्चेत नगरसेवक रुची कुंभारकर, सुरेश खेताडे, पूनम मोगरे, सरिता सोनवणे, विभागीय अधिकारी विवेक धांडे, उद्यान विभागाचे वसंत ढुमसे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संजय दराडे, डॉ. प्रमोद सोनवणे, बांधकाम विभागाचे निकम सहभागी झाले होते.
मंगळवारी लग्नतिथी दाट असल्याने अनेक नगरसेवक प्रभाग बैठकीला उपस्थित नव्हते. प्रभाग समिती बैठकीत विषयपत्रिकेतील विषय वाचन झाल्यानंतर विनाचर्चा सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.