कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मालेगावमधील ३१ गुन्हेगार तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 10:05 PM2018-01-06T22:05:52+5:302018-01-06T22:06:17+5:30
मालेगावमधील ३१ गुन्हेगारांचा समावेश आहे. या गुन्हेगारांवर दंगा करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, प्राणघातक हल्ले, हाणामारी सारखे गुन्हे दाखल आहेत. पुढील तीन वर्षांसाठी यांना तडीपार करण्यात आले आहे.
नाशिक : प्राणघातक हल्ले, दंगल माजविणे, अवैधरित्या शस्त्रे वापरणे, सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान करणे, गुन्हेगारीसाठी टोळी जमविणे यांसारख्या गुन्ह्यात सहभाग असलेल्या सुमारे ३१ सराईत गुन्हेगारांना पोलीस अधिक्षक संजय दराडे यांनी तडीपार केले आहे.
मालेगाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था टिकून रहावी, या उद्देशाने जिल्ह्यात शांतता कायम राहावी यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार दंगलीसह इतर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची पोलीस ठाणेनिहाय माहिती तयार करुन यादी करण्यात आली. त्यामध्ये मालेगावमधील ३१ गुन्हेगारांचा समावेश आहे. या गुन्हेगारांवर दंगा करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, प्राणघातक हल्ले, हाणामारी सारखे गुन्हे दाखल आहेत. पुढील तीन वर्षांसाठी यांना तडीपार करण्यात आले आहे.
तडीपार गुन्हेगारांची नावे अशी
विजय अशोक वाघ (३५), दीपक अशोक कुलकर्णी (२६), कोमल दत्तात्रय मोरे (३४), बिलाल मोहमंद अजमल अन्सारी (२४), धनराज पंढरीनाथ्लृ पाटील (२७), कल्पेश दिनेश ब्राम्हीकर (२५), शेख तौसिफ उर्फ पापा सुलेमान, गोकुळ प्रकाश पाटील (२५), निशांत जिभाऊ रायते (२२), शेख हबीब शेख महेबुब उर्फ हबीब गोट्या (२७), सैयद रहीम सैयद खालीद उर्फ हँडसम (२४), शकील अहमद मोहमंद हसन उर्फ जाबीरशेठ (५३), शक्ती राजेंद्र सौदे (३२), देवा दादाजी मेहंदळे (२१), चेतन उर्फ हल्या मिच्छंद्र सुर्यवंशी (२३), शेख अिसफ शेख नजीर उर्फ अिसफ काल्या, दीपक ओंकार शिंदे (४०), प्रविण प्रकाश मोरे, अरीफ बेग अश्रफ बेग (२९), सैयद वाहीद सैयद खालीद उर्फ चिंग्या (२१), अमोल संजय जगताप (२६), मुन्ना दिलीप बच्छाव (२६), अजिंक्य धनंजय बच्छाव (२६), विजय गोविंद देवरे (२५), शिहद अहमद मोहंमद सलीम उर्फ राजू बांगडू (३६), प्रदीप उर्फ ज्यांग्या बापू सुर्यवंशी (३०), संदीप पांडुरंग बागुल (३५), कपील भावराव अहिरे (२८), सैयद जाबीर सैयद मुक्तार (३५).