३१ मतदान केंद्रे संवेदनशील
By Admin | Published: February 18, 2017 11:26 PM2017-02-18T23:26:46+5:302017-02-18T23:27:06+5:30
प्रशासनाची तयारी : ६५० कर्मचाऱ्यांचे नियोजन
नाशिक : पश्चिम विभागात निवडणूक कार्यालयाने ३१ मतदान केंदे्र संवेदनशील असल्याचे निर्देशित केले असून, यात काही क्रिटिकल केंद्रांचाही समावेश आहे. या संवेदनशील मतदान केंद्रांवर निवडणूक विभागाचे विशेष लक्ष असून, आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक ७, १२ व २४ साठी महापालिका निवडणूक मतदान प्रक्रियेची तयारी अंतिम टप्पात आली आहे. विभागातील तिन्ही प्रभागांच्या १४२ मतदान केंद्रांवर मतदानप्रक्रिया राबविण्यासाठी निवडणूक कार्यालयाला एकूण ३१२ मतदान यंत्रे व १५७ नियंत्रण यंत्रे प्राप्त झाली आहेत. या सर्व यंत्रांची अंतिम तपासणी झाली पूर्ण असून, मतदान यंत्रे सीलबंद करून ठेवण्यात आल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. पश्चिम विभागात निवडणूक कार्यालयाने मतदान प्रक्रिया सुनियोजित पद्धतीने पार पाडण्यासाठी जवळपास साडेसहाशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)