३१ गाळ्यांचे काम जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:45 AM2019-07-13T00:45:48+5:302019-07-13T00:46:30+5:30

दिंडोरीरोडवरील मेरी रासबिहारी लिंकरोडवरील एका खासगी जागेत महापालिकेची कुठली परवानगी न घेता अनधिकृतपणे सुमारे २५ ते ३० दुकानांचे केलेले बांधकाम महापालिकेच्या अतिक्र मण विरोधी पथकाने शुक्रवार (दि.१२) दुपारी उद््ध्वस्त केले आहे.

31 sludge work | ३१ गाळ्यांचे काम जमीनदोस्त

३१ गाळ्यांचे काम जमीनदोस्त

Next
ठळक मुद्देअतिक्रमण : मेरी-रासबिहारी रोडवर कारवाई

पंचवटी : दिंडोरीरोडवरील मेरी रासबिहारी लिंकरोडवरील एका खासगी जागेत महापालिकेची कुठली परवानगी न घेता अनधिकृतपणे सुमारे २५ ते ३० दुकानांचे केलेले बांधकाम महापालिकेच्या अतिक्र मण विरोधी पथकाने शुक्रवार (दि.१२) दुपारी उद््ध्वस्त केले आहे. यात येथील हॉटेल प्या-प्याचे अतिक्रमणदेखील हटविण्यात आले आहे.
मेरी रासबिहारी लिंकरोडवर असलेल्या एका खासगी प्लॉटवर गेल्या अनेक वर्षांपासून जागामालकाने भाडेतत्त्वावर अनधिकृत दुकाने थाटण्यास परवानगी दिली होती त्यानुसार पंचवीस ते तीस दुकानदारांनी दुकाने थाटून अनधिकृतपणे बांधकाम करत व्यवसाय थाटलेले होते. सदर जागेचा नकाशा व कोणत्याही प्रकारचा ले-आउट मंजूर झालेला नव्हता तसेच महापालिका प्रशासनाचीदेखील संबंधित जागामालकाने कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. सदर बाब महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास येतात महापालिकेच्या अतिक्र मण विभागाने दुकानांचे बांधकाम हटविण्याची कारवाई केली आहे.
पक्के बांधकाम हटविले
शुक्र वारी दुपारी महापालिकेच्या अतिक्र मण विरोधी पथकाने कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत बांधकाम केलेल्या दुकानांचे अतिक्र मण हटविले. मुख्य रस्त्याला लागूनच व्यावसायिकांची दुकाने थाटलेली होती याठिकाणी फरसाण कारखाना, टायर दुकान, भंगार विक्रे ते, रोलिंग शटर्स आदींसह विविध प्रकारची दुकाने अनधिकृतपणे उभारलेली होती.

Web Title: 31 sludge work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.