सिन्नर तालुक्यात ३११ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 02:21 AM2020-07-24T02:21:22+5:302020-07-24T02:21:47+5:30
सिन्नर शहरासह तालुक्यात गुरुवारी २७ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून, चारशेचा टप्पा ओलांडल्यानंतर अवघ्या चारच दिवसात ५० रुग्ण वाढल्याने तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५२ झाली आहे. त्यापैकी ३११ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
सिन्नर : शहरासह तालुक्यात गुरुवारी २७ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून, चारशेचा टप्पा ओलांडल्यानंतर अवघ्या चारच दिवसात ५० रुग्ण वाढल्याने तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५२ झाली आहे. त्यापैकी ३११ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
आरोग्य विभागाला गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये शहरातील १९ तर ग्रामीण भागातील ८ असे २७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. शहरातील सरदवाडी रोड परिसरात ४९, ४० आणि ३२ वर्षीय पुरुष, ७९ व ५२ वर्षीय महिला, सोनार गल्लीतील ७१ वर्षीय महिला, ढोकेनगर येथील ४३ वर्षीय पुरुष, वृंदावननगर येथील ४८ वर्षीय पुरुष, मॉडर्न कॉलनीतील ३९ वर्षीय पुरुष, शिवाजीनगरमधील ३२ वर्षीय पुरुष व गवळीवाडी येथील ४२ वर्षीय पुरुष, विजयनगर येथील ५८ वर्षीय महिला, कमलनगर येथील ४० वर्षीय पुरुष, उद्योगभवन परिसरातील ४० वर्षीय पुरुष, मॉडेल कॉलनीतील ३२ वर्षीय महिला व १२ वर्षाचा मुलगा, अशोका परिसरातील २६ वर्षीय पुरुष, ४ व दीड वर्षीय मुले असे १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
तर र्ग्रामीण भागात ग्रामीण भागातील ठाणगाव येथील ३७ वर्षीय पुरुष, बारागावपिंप्री येथील ४२ वर्षीय पुरुष, सोनारी येथील ३३ वर्षीय पुरुष, वडगावपिंगळा-विंचूर येथील ३३ वर्षीय पुरुष, पाटोळे येथील ३६ वर्षीय पुरुष, २८ वर्षीय महिला, माळेगाव येथील ३२ वर्षीय पुरुष, सरदवाडी येथील २१ वर्षीय पुरुष असे ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
दरम्यान, बुधवारी सायंकाळपर्यंत तालुक्यातील ११ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. मात्र रात्री उशिरा आरोग्य विभागास प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये १२ नवीन रुग्णांची भर पडली. बुधवारी १० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत ३११ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.